Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ७ मार्च, २०२४

संग्रामनगर येथील श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी व व्याख्यान संपन्न

 


अकलुज --प्रतिनिधी 

शाकूर तांबोळी

टाइम्स 45 न्युज मराठी.

              जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत संग्रामनगर, आरोग्य उपकेंद्र संग्रामनगर आणि श्री जयसिंह मोहिते- पाटील विद्यालय संग्रामनगर यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य विषयक व्याख्यान गुरुवार दि. ०७रोजी करण्यात आले. 



      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाला समिती सभापती निशा गिरमे उपस्थित होत्या तर प्रमुख व्याख्याते म्हणून अकलूज येथील सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ प्रिती गांधी आणि प्रमुख अतिथी म्हणून संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आशा सावंत, सदस्या स्मिता माने-देशमुख, आरोग्य उपकेंद्र संग्रामनगरच्या प्रमुख डॉ. सायली चंदनशिवे, आरोग्य सेविका विश्रांती पाटील, मुख्याध्यापक मल्हारी घुले, ग्रामविकास अधिकारी मुंगुसकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

         सर्व प्रथम सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आणि रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 



  यानंतर डॉ प्रिती गांधी यांनी महिलांच्या आरोग्य समस्या, त्याची कारणे आणि उपाययोजना यावर चर्चा केली तसेच महिलांमधील वाढत्या कॅन्सरच्या प्रमाणाकडे गांभीर्याने पाहून काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

     विद्यार्थ्यीनी ज्ञानेश्वरी उबाळे हिने भाषणात महिला दिनाचा इतिहास उलगडला. उपसरपंच आशा सावंत यांनी महिलांनी सक्षम होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच डॉ सायली चंदनशिवे यांनी महिला आरोग्य विषयक शासकीय योजना व सुविधांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा निशा गिरमे यांनी आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या महिलांचे कौतुक केले तर स्वतः ची तपासणी करून घेत जास्तीत जास्त महिलांनी अशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सगळ्यांची काळजी घेणार्या स्त्रीने स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असे ही सांगितले. 

या शिबीरात ५६महिलांनी सहभाग नोंदविला. 

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्रांती पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राथमिक विभाग मुख्याध्यापक गणेश करडे सर यांनी केले. 

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र कवटे, नवनाथ राऊत, सुवर्णा पवार, अनिता सुर्यवंशी,आरोग्य विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कष्ट घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा