Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ मार्च, २०२४

*अकलूज नगर परिषदेच्या वतीने विविध उपक्रमाने" जागतिक महिला दिन" साजरा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो. 9730 867 448

            अकलूज नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी .दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली "जागतिक महिला दिन"साजरा करण्यात आला असुन महिला दिनाचे औचित्य साधून नगरपरिषद कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमासाठी डॉटर मॉम ग्रुप च्या अध्यक्षा, बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाच्या प्रणेत्या व माजी जि.प.सदस्या.शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच .संगीता गडदे (आरोग्य कोच) .नाना गडदे सर ,.गुंजाळ सर यांचे महिलांविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते" क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.आरोग्य कोच .गडदे मॅडम यांनी महिलांना स्त्री भ्रूण हत्या ,बालविवाह याविषयी माहिती सांगितली.तसेच गुंजाळ यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मागर्दर्शन केले .कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शितलदेवी मोहिते पाटील यांनी मुलगा व मुली याचे भेद न करता आजच्या समाजात मुली कशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत हे सांगितले .त्याचबरोबर महिलांनीच महिलांना सर्वच बाबीत कसे प्रोत्साहन द्यावे हेही सांगितले .कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या यांच्या हस्ते नगरपरिषद हद्दीतील ज्या मातांना फक्त दोन मुली आहेत अशा मातांचा महिला दिनानिमित्ताने प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलांचे सादरीकरण केले .



यानंतर उपस्थित सर्व महिला वर्गासाठी संगीत खुर्ची खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला व नगर परिषद मधील कर्मचारी महिला यांनी सहभाग घेतला होता. विजेत्या महिलांना नगरपरिषद मार्फत आकर्षक बक्षीस देण्यात आले .तसेच ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांमध्ये मतदानाची जनजागृती करण्यात आली आणि माझी वसुंधरा अभियान ची हरीत शपथ घेण्यात आली.यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अकलूज नगर परिषद च्या मिळकत पर्यवेक्षक 



.प्रणिता शेंडगे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालय अधीक्षक अभिलाषा निंबाळकर ,मिळकत पर्यवेक्षक प्रणिता शेंडगे आणि सर्व नगरपरिषद कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा