*अकलुज-----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 46 न्युज मराठी
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभाग यांच्या वतीने जागतिक कविता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रसिद्ध प्रमुख व कवयित्री शिवमती सुवर्णा गोरवे यांचा सत्कार शाल व गुलाब पुष्प व पुस्तक देऊन करण्यात आला.यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुका अध्यक्ष शिवमती मनोरमा लावंड, माळशिरस तालुका उपाध्यक्ष शिवमती मनीषा गायकवाड, अकलूज शहर कार्याध्यक्ष शिवमती शारदा चव्हाण संघटक शिवमती कल्पना चव्हाण,संघटक शिवमती आशा सावंत,संगीता देशमुख,शिवमती सुजाता लावंड,शिवमती वंदना पवार उपस्थित होत्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा