*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने आढळणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेली सिमेंट कँक्रीटची जंगले,वृक्षतोड,प्रदूषण यामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आज चिमण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय असे प्रतिपादन पर्यावरण प्रेमी प्रा धनंजय देशमुख यांनी केले.
ते यशवंतनगर ता.माळशिरस येथील महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेमध्ये चिमणी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सद्या उन्हाळा वाढत चाललेला आहे त्यामुळे मनुष्याबरोबरच पक्षांना ही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे नैसर्गिक पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पक्षांचे उन्हाळ्यात अतोनात हाल होत चालले आहेत या पक्षांचा चिमणीचा जीव वाचला पाहिजे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या घराच्या परीसरात पाणी आणि अन्नधान्य याची सोय करावी असे आवाहन प्रा.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले
यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्लेट, कॅन, बॉटल तसेच लाकडी बॉक्स, पाइप यापासून निवारा,अन्नधान्य तसेच पाण्याची साधने कशाप्रकारे बनवायची याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर,स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य अनिल जाधव, पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे, जेष्ट शिक्षक शिवाजी थोरात,क्रिडा शिक्षक अनिल मोहिते, संगीत शिक्षक बाळासाहेब झांबरे, मनोज सरवदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण सुर्यवंशी यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा