इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
इंदापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्या उपाध्यक्ष पदी शाहरुख जमादार (बावडा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष ओंकार सरडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र), दत्तात्रय (मामा) भरणे (माजी राज्यमंत्री, आमदार), तसेच प्रदिप गारटकर (जिल्हाध्यक्ष) व हनुमंत कोकाटे (तालुकाध्यक्ष) यांचे मार्गर्शनाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्य व ध्येयधोरणे, आचार विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचवून पक्ष संघटना मजबुत व बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयानशिल राहावे.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्य व ध्येयधोरणे, आचार विचार सर्वसामान्य गोरगरीब नागरीक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे शाहरुख जमादार यांनी निवडी प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
फोटो - शाहरुख जमादार
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा