*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
"पाठीवर" वार करणार्यापेक्षा ,पोटावर "वार" करणारा अधिक "घातक" असतो. आज मुस्लिम म्हणून तुम्ही - आम्ही सर्वजण "प्रेषित महंमद पैगंबर " यांच्या आदर्श "विचारसरणीला" यथायोग्य न्याय" देत आहोत का ?? त्याच्या सुखसमृध्दीची -भरभराटीसाठी प्रयत्नशील आहोत का ??? दुसऱ्याच्य सुखात ,आपले "सुख" आपण मानतो का ?? सामाजिक क्षेत्रात राहताना गोरगरिबांचा उद्धार आपल्या मनाला "स्पर्श" करतो का ???
राजकीय क्षेत्रात वावरताना धडाकेबाज ,जिगरबाज असणाऱ्या , समाजासाठी छातीचा कोट करणाऱ्या "कपटी" शत्रूचा "कावा" ओळखणाऱ्या नेतृत्वाला आपण भक्कम "साथ" देता का ?? शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समाजाची विलक्षण पीछेहाट होत असताना तेंव्हा एखाद्या "जाणकार - हुशार" शिक्षण तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीला उत्तेजन देत आहोत का ???
आज खचितच सख्खा भाऊ ,सख्ख्या भावाचा "वैरी" नाही का ?? ,एक कार्यकर्ता पुढे जात असेल तर त्याचे "पाय ओढणारा" दुसरा कार्यकर्ता मुस्लिम नसतो का ??? एखाद्याचा व्यवसाय असेल तर त्याच्याचं "दुकानासमोर" दुकान काढून समोरच्या व्यक्तीला नामोहरण करणारा मुस्लिम नाही का ???, धार्मिक ताकद अफाट असताना, एखाद्या "मस्जिदची ट्रस्ट" चांगले काम करत असेल तर त्यांना "प्रोत्साहन" देण्याऐवजी ते काम रोखणारे - अडसर आणणारे -त्रास देणारे "जेष्ठ मुस्लिमच" नाहीत का ?? निवडणुकांमध्ये दगडा पेक्षा वीट "मऊ" हें समजून मतदान करणार का ?? "वास्तव" परिस्थिती पाहून मुस्लिम केंव्हा शहाणा होणार ???
हिंदू बांधव तुमचा शत्रू नाही ,तर मुस्लिमचं तुमचा "शत्रू" नाही का ??? आपणच आपल्या बांधवांवर "अन्याय" करत नाही का .??
रमजान महिन्यात गरजवंताला पैशाची गरज असते .मुलांना कपडे - खीर साठी साहित्य हवे असते . रमजान च्या शेवटच्या आठवड्याची वाट न पाहता पहिल्याचं आठवड्यात" मुस्लिम त्या गरजवानांना मदत का देऊ शकत नाही ??? गरजवंतांना "अक्कल" नसते , प्रतिष्ठेची भीती असते ,म्हणून आपणच त्याच्या खिशात 1000-2000 का ठेवू शकत नाही का ??? गेल्या रमजान मध्ये मी स्वतः 3 गरजवंतांना पैसे देताना त्यातील एका गरीब फेब्रिकेशन कामगार असणाऱ्या व्यक्तीने मला जे सांगितले ते ऐकून मला "धक्का" बसला .तो म्हणाला ,साहेब ,आज तुम्ही दिलेले पैसे घेऊन आत्ताच सांगलीतील गणेश मार्केट मध्ये जातो बघा ...कारण ईद उद्या आहे पण माझ्या दोन्ही मुलींना कपडेच नाहीत हो.. ! मी अक्षरशः "निशब्द" झालो . सांगायचा उद्देश हा होता ..की रमजान च्या "शेवटी" पैसे न देता त्याआधी जकातची अथवा स्वखुशीने संबंधित "रक्कम" गरजवंतांपर्यंत पोहोचायला हवी. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता मी कालचं "4 थ्या" रोजलाच बंद लिफाफा गरजवंतांना देऊन प्रेषितांची खरी सुन्नत अदा केली आहे . वाचकांना एक "आदर्श" मिळावा म्हणून हें कार्य नमूद केले.
लोकसभेचे मतदान ..आणि भविष्यातील वास्तव* !
राज्यकर्ते "राज्य" करताना "साम - दाम - दंड -भेद" याचा यच्छेद वापर करतात . त्यांना कुठल्याही धर्माशी काहीही देणे -घेणे नसते . फक्त आपल्या मतांच्या माध्यमातून स्वतःची "पोळी" भाजून घेण्याचा एककल्लि कार्यक्रम असतो. मुस्लिमाना " फसवण्यासाठी " सत्ताधारी विविध निधी देतात . मदत करतात.
जेणेकरून हा समुदाय आपणास निदान 50% मतदान करेल हा त्यांचा हेतू असतो . पुढील 5 वर्ष सहन करायचे की क्षणभंगुर " निधी" चा मोबदला "मते" देऊन परतफेड करायची??? निर्णय समस्त मुस्लिमांनी करावयाचा आहे . एक चूक महागात पडणार आहे . विचार करा ..अजून वेळ गेलेली नाही. लोकसभेचे बिगुल वाजलेले आहे .समस्त मुस्लिमांनी दगडा पेक्षा वीट मऊ ..या उक्तीनुसार मतदानाचा अधिकार बजावावा !
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( पत्रकार)*
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा