Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २ मार्च, २०२४

*ऊसतोड महिला कामगार व बालकांना जिजाऊ ब्रिगेडचा मदतीचा हात* *जिजाऊ ब्रिगेडने सामाजिक जबाबदारी जपली*

 


*अकलुज ----प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी

           जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबविले जात असून त्यातून सामाजिक जबाबदारी जपली जात आहे.तळागाळातील घटकांना नेहमीच मदत व सहकार्याचा हात देण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा मनोरमा लावड यांनी व्यक्त केले.



         मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर सोलापूर विभाग,माळशिरस तालुका अकलूजच्या वतीने आदिवासी भागातील ऊसतोड करण्यासाठी माळशिरस तालुक्यात लोक, महिला व बालक येत असतात त्यांना आज साड्या,लहान मुलांना कपडे खाऊ व चपला वाटप करण्यात आले.

          मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर सोलापूर विभाग अकलूजच्या वतीने नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान जपत सामाजिक सेवा बजावली आहे.मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड अकलूज सोलापूर पंढरपूर विभाग यांच्या वतीने आदिवासी भागातील ऊसतोड महिला कामगारांना लवंग २५/४ येथे डॉ.पवार यांच्या ऊसाच्या फंडात तोडणीसाठी हे महिला कामगार आले असताना.ऊस तोड मजूर महिलांना व मुलांना जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून साड्या,लहान मुलांना कपडे,

चप्पल,खाऊ वाटप करण्यात

आले.



          यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सदस्या आक्काताई माने, माळशिरस तालुकाध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड,मनीषा गायकवाड,माळशिरस तालुका उपाध्यक्ष शिवमती शुभांगी क्षीरसागर,अकलूज शहराध्यक्ष शिवमती शारदा चव्हाण,शहर कार्याध्यक्ष शिवमती संगीता जगदाळे,शिवमती सुवर्णा गोरवे,प्रसिद्धी प्रमुख शिवमती वंदना पवार व उषा काजळे यांचे सह जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा