*संपादक ---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या धाराशिव जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी धाराशिव शहरातील विश्रामगृह येथे दि ५ मार्च राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने अल्पसंख्यांक विभागाची पक्षाचे प्रदेश सचिव मसुद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफीक शेख यांच्याहस्ते नियुक्ती पञ देऊन इस्माईल काझी यांची अल्पसंख्यांक धाराशिव शहर पदी तर अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्षपदी बाबा फज्जोदुद्दीन यांची फेर निवड तर तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी आफसर सुजाऊद्दीन शेख यांची निवड करण्यात आली तसेच , तुळजापूर शहराध्यक्षपदी वाहेद शेख, तेर शहराध्यक्षपदी हकीम मुलानी इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आले आहेत.
याप्रसंगी मसूद शेख यांनी भाषणामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायच्या आहे. व येणाऱ्या काळात जास्तीत जास्त पक्षाचे ध्येय धोरण सर्वांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकटी साठी प्रयत्न करा असे आवाहन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले
याप्रसंगी प्रदेश सचिव मसुद शेख, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफीक शेख, जिल्हा अ.सं.सचिव शेख लईख, अन्वर शेख, वाजिद पठाण, ईल्यास पिरजादे, मुशर्रफ मुजावर, ,माजी नगरसेवक बाबा मुजावर, इब्राहिम इनामदार, काझी मसउद, मुलाणी हुकमअली, इरफान शेख , सैफन शेख , मसुद शेख, मुश्ताक कुरेशी, इरशाद कुरेशी, आझर पठाण, इरशाद काझी, यांच्या सह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा