*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळ्यातील सारा लालमन अंधारे इयत्ता अकरावी या 18 वर्षीय युवतीने पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील भावडी रोडवरील गृहनिर्माण संस्थेच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या केली आहे आत्महत्येचे अद्यापही कारण समजले नाही वाघोली येथील मामाकडे ती वास्तव्यास होती
सारा अंधारे ही प्रथमता शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लिफ्टने इमारतीच्या आठव्या मजल्यावर गेली तेथील रिफ्युज गॅलरीमध्ये तिने आपल्या पायातील चप्पल काढली आणि थेट आठव्या मजल्यावरून उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली इमारतीच्या खाली मोठा आवाज झाल्याने गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी त्वरित धाव घेतली तेव्हा सारा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली यावेळेस तेथील राहणाऱ्या नागरिकांनी त्वरित पोलिसांना बोलावले पोलिसांनी तातडीने दिला रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला अखेर मृत घोषित केले सारा याने आत्महत्याचे पाऊल का उचलले याबाबत वाघोली येथील लोणीकंद पोलीस पुढील तपास करीत आहे
सारा अंधारे ही मूळची करमाळा शहरातील रहिवासी आहे सारा हिच्या आत्महत्येने मात्र करमाळा शहरात एकच खळबळ उडाली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा