Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २ मार्च, २०२६

ब्रेकींग बातमी* *इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात महागाईचा भडका उडण्याची शक्यता; पेट्रोल १३५ रुपये लिटर पार जाणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली आज रात्री तातडीची बैठक*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*




*नवीदिल्ली-* इराण-इस्रायल यांच्यातील युद्ध केवळ रणभूमीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याचे पडसाद आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या किचन बजेटवर उमटू लागले आहेत. इराण अमेरिका-इस्रायल तणाव असाच कायम राहिल्यास जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होऊन भारतात महागाईचा मोठा स्फोट होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

युद्धाग्नीची तीव्रता वाढल्यास त्याची सर्वाधिक झळ भारताला बसू शकते, आणि भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून महागाईचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री दिल्लीत पोहोचत आहे. तिथं ते लगेचच कॅबिनेट कमिटी आँन सिक्योरिटीची बैठक घेणार आहे. ही बैठक रात्री उशिरा होण्याची शक्यता आहे.

इराण-इस्त्रायलने-अमेरिकेमधील युद्ध भारतापासून 2 हजार 139 किलोमीटर दूर सुरू आहे. यातच अफगाणिस्तान अन् पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. एकप्रकारे पश्चिम आशियात युद्धाग्नीची धग लवकरच भारतापर्यंत, घरापर्यंत पोहोचणार आहे. या महायुद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढून महागाईचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसा अर्थतज्ज्ञांनी इशारा दिला आहे. इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. इराणकडे तब्बल 158 बिलियन बॅरल कच्च्या तेलाचा साठा आहे. जरी अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराण पूर्ण क्षमतेने निर्यात करू शकत नसला, तरी चीन आणि भारतासारख्या देशांसाठी इराण हा महत्त्वाचा स्रोत आहे.

चीन दररोज 18 लाख बॅरल तेल इराणकडून घेतो. भारताचा विचार केला, तर आपल्या एकूण गरजेपैकी 40 टक्के कच्चे तेल आणि 50 टक्के एलएनजी खाडी इराण, सौदी अरब, युएई या देशांमधून येते. पण आता या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. भारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे होर्मुज जलडमरूमध्य. हा एक अत्यंत अरुंद सागरी मार्ग आहे, ज्याला जागतिक तेलाची 'लाईफलाईन' म्हटले जाते. जगातील 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गातून होते. भारताच्या एकूण तेल आयातीपैकी 50 टक्के तेल याच मार्गाने येते. सौदी, इराक, कुवेत आणि कतारचे तेल देखील याच मार्गाने भारतात पोहोचते.

युद्धामुळे इराणने हा मार्ग बंद केला, तर भारतासह चीन आणि जपानला तेलाच्या महासंकटाचा सामना करावा लागेल. मालवाहतूक आणि विम्याचा खर्च वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल. युद्धाची तीव्रता वाढल्यास, आणि तेल पुरवठा खंडित झाला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 95 ते 110 डॉलर प्रति बॅरल पर्यंत जातील. सध्या ब्रेंट क्रूड 73 डॉलरच्या आसपास असले तरी ते सात महिन्यांच्या उच्चांकावर आहे. भारतातील तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा भार जास्त काळ सोसू शकत नाहीत. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ अटळ आहे. जागतिक परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पेट्रोलचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु याबाबत अशी कोणतीही माहिती भारत सरकारकडून देण्यात आलेली नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा