*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
मुस्लिम धर्मियांमध्ये पाच तत्वा पैकी रोजाला विशेष महत्त्व आहे सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजानचा महिना चालू झाला आहे अशा या कडक रमजानच्या महिन्यामध्ये पहिला रोजा करमाळा शहरातील खदक रोड येथील जुनेद ईमत्याज पठान या पाच वर्षीय चिमुकल्याने रमजानचा रोजा पूर्ण केला अवघ्या अल्पवयात त्यांनी असा हा कडक रोजा पूर्ण केल्याने त्याचे सर्व स्तरातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे
करमाळा शहरातील खंदक रोड येथे राहणारे रहिवासी ईमत्याज हबीब पठान यांचे ते चिरंजीव आहेत जुनेद ईमत्याज पठान पाच वर्षीय चिमुकल्याने रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला आहे त्याने सदरचा उपवास जामिया मशीद मध्ये सोडला.अगदी लहान वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे सकल मुस्लिम समाजाचे ता.अध्यक्ष हा.कलीम काजी(सर)व शहराध्यक्ष जमिर सय्यद,अब्दुल कलाम फाऊंडेशन चे समिर शेख,रमजान बेग,रहेनुमा चे सुरज शेख,रोहित पवार फाऊंडेशन चे ता.अध्यक्ष मुस्तकीम पठान यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे त्याला या कामी आई,वडील,चुलते व चुलती तसेच आजोबा पै.हबीब दुलेखा पठान यांचे विशेष मार्गदर्शन लाभले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा