Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ मार्च, २०२४

*धाराशिव येथील" जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय" तळीराम आणि रोडरोमिओ -च्या विळख्यात..* *रुग्णांच्या नातेवाईकांची "शौचालया" अभावी हेळसांड*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

             महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाची सुसज्ज अशी इमारत उभी करून जिल्ह्यातील रुग्णांसाठी चांगली आणि आधुनिक पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र हे या रुग्णालयाची" असून अडचण नसून खोळंबा "अशी अवस्था आहे

या रुग्णालयात आधुनिक पद्धतीची सुविधा असल्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र या रुग्णालयात आधुनिक सुविधा तर आहेच मात्र डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्ये अभावी रुग्णांची गैरसोय होत आहे वरचेवर रुग्णांची संख्या वाढत असताना या रुग्णालयात शासनाने उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढवण्याची गरज असून डॉक्टर आभावी रुग्णांना जीवाला मुकावे लागत आहे



तसेच या रुग्णालयात हजारोंच्या संख्येने दररोज विविध प्रकार च्या उपचारासाठी रुग्ण येत असतात शिवाय ऍडमिट केलेल्या सिरियस रुग्णा सोबत रुग्णांचे नातेवाईक असतात त्यामध्ये महिलांचे अधिक समावेश असतो त्या महिलांची शौचालया अभावी हेळ सांड आणि गैरसोय होत आहे त्यामुळे रुग्णांमध्ये नाराजीचे सूर दिसून येत असुन रुग्णालयाच्या दक्षिणेकडे असलेल्या संरक्षण भिंती जवळ रुग्णांच्या नातेवाईकांनी शौचालया अभावी घाणीचे साम्राज्य निर्माण केले आहे त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात सुलभ शौचालयाची निकडीची गरज आहे.


शिवाय या रुग्णालयाच्या आवारात तळीरामांचा आणि रोडरोमिओ चा वावर वाढल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन रुग्णांच्या महिला नातेवाईका मध्ये भितीचे वातावरण दिसुन येत आहे 

मागील दोन दिवसापूर्वी एका रोडरोमिओ ने रुग्णालयातील एका परिचारिकेचा विनयभंग केल्याचे समजते

तरी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंञी व आरोग्यमंञी तानाजी सावंत हे या जिल्ह्यातील असुन आरोग्य मंञ्यांनी या बाबी कडे गांभीर्याने लक्ष देऊन यांच्या वर कायदेशीर कारवाई करतील ? असे नागरिकां मधुन चर्चा होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा