*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आपसिंगा ता. तुळजापूर येथे रानडुकरांनी शेकडो शेतकऱ्यांच्या ज्वारी पिक खाऊन फस्त करून नुकसान केल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या याबाबत वनविभागाला कल्पना असून सुद्धा वन विभाग "झोपेचे सोंग घेत आहे "त्यामुळे हाता तोंडाला आलेले ज्वारीपिक हे रानडुकरे फस्त करत आहेत
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिवसा ही रानडुकरे कुठेही झाडाझुडपात दडी मारून बसतात आणि रात्रीच्या वेळी शेकडोच्या काळपाने निघून शेतकऱ्यांच्या शेतात घुसुन ज्वारीचे फस्त ही करतात आणि नुकसान ही करत आहेत विशेषतः यंदा पर्जन्यमान कमी असल्यामुळे खरीप पिका मध्ये काही हाती लागलेच नाही परंतु आहे त्या शेतातील ओलीवर शेतकऱ्यांनी किमान वर्षाकाठी कुटुंबाच्या उदरनिर्वाह साठी ज्वारीचं होईल म्हणून या आशेपोटी ज्वारीची पेरणी केली आणि पोटच्या मुलाप्रमाणे पोसलेली ज्वारी काढणीस आल्यानंतर या रानडुकरांनी नुकसान केल्याने "तेलही गेले आणि तुपही गेले "अशी अवस्था झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे तरी वन विभाग याकडे जातीने लक्ष देऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करतील का ?असे शेतकरी वर्गातून चर्चिले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा