Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३ मार्च, २०२४

*मराठा तरुणांना मोठा दिलासा ----दहा टक्के मराठा आरक्षणासह ,पोलीस भरती होणार ;--देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

मुंबई:---पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. कारण राज्य शासनाने 17 हजार 471 पोलिसांची भरती करण्यासाठी जी जाहिरात काढली त्यात 10 टक्के मराठा आरक्षण देखील लागू राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाची अमलबजावणी देखील सुरु झाली आहे. त्यामुळे पोलीस भरतीत देखील हे 10 टक्के आरक्षण मराठा समाजातील तरुणांना लागू असणार असल्याची घोषणा फडणवीसांनी विधानपरिषदेत केली आहे.

विधान परिषदेत नियम 260 अन्वये प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवीण दरेकर आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना फडणवीस बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, "लोकप्रतिनिधींना धमक्या देणारे फोन कॉल्स करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. 2022-23 मध्ये रिक्त झालेली 100 टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे 17 हजार 471 इतकी पोलीस भरती आणखी होणार आहे. ही पोलीस भरती 10 टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा