अकलुज --प्रतिनिधी
शाकूर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
जगातील सर्वांत सुंदर स्त्री आपली आई असते असे प्रतिपादन प्रा. देवानंद साळवे यांनी श्री जयसिंह मोहिते- पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.
आपल्या आईच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही असे आपण वागले पाहिजे. आधुनिक काळातील मोबाईल सोशल मीडिया अतिवापरामुळे आपण या झगमगीत दुनियेत स्वतःला विसरत चाललो आहे.त्याला आळा घालून चांगले दिसण्यापेक्षा आपले विचार आचार चांगले असावेत.प्रत्येकाने स्त्रीचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी पुढे बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाला समिती सभापती निशा गिरमे उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. देवानंद साळवे तसेच मुख्याध्यापक मल्हारी घुले सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक गणेश करडे सर, पूर्व प्राथमिक प्रमुख अनिता सुर्यवंशी, शिक्षिका विजया पेटकर,रोहिणी गायकवाड,आरती दोरकर,शुभांगी कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्व प्रथम सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आणि रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
त्यानंतर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला शिक्षिकेंचा सन्मान प्रशालेच्या वतीने करण्यात आला. तसेच भारतीय महिला सुधारकांच्या वेशभूषेत आलेल्या मुलींचे, भगवदगीता स्पर्धेत यश मिळवल्या बद्दल हिंदवी राजेंद्र शिंदे
चित्रकला इलेमिंट्री ग्रेड परिक्षेत ए ग्रेड संपादन केल्याबद्दल संयोगिता माने यांचा कार्यक्रमाच्या अध्यक्षा निशा गिरमे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संयोगिता माने, सुजाता नरवडे, अनुष्का शिंदे, श्रेया क्षीरसागर यांनी भाषणे केली तसेच, सुत्रसंचालन सृष्टी गायकवाड आणि मृणाल खाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रशीद मुलाणी, सुरेश माने,संतोष कदम, रवींद्र कवटे,सतिश एकतपुरे, गणेश म्हसवडे,नवनाथ राऊत,सुनील काळे यांनी कष्ट घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा