Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ९ मार्च, २०२४

*आर पी आय आठवले गटाला मित्रपक्षाने दोन जागा न सोडल्यास कार्यकर्ते बंडाचे निळे निशान फडकवणार*

 


*श्रीपूर -----बी.टी.शिवशरण.

             लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात मतदान होईल आरपीआय आठवले गट भाजप बरोबर गेल्या दहा वर्षांपासून मित्र पक्ष म्हणून युतीत सहभागी आहे आरपीआय आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील मित्र पक्ष असलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या कडे आम्हाला किमान दोन जागा सोडण्याची मागणी केली आहे शिर्डी व सोलापूर लोकसभा मतदारसंघ या जागेची मागणी पहिल्या पासून आरपीआय आठवले गट यांचे कडून होत आहे जागा वाटपाची प्रक्रिया वर नमूद केलेल्या मित्रपक्षांनी जवळपास निश्चित केल्याचं दिसून येत आहे जर आरपीआय आठवले गटाला त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मागणी केलेल्या दोन जागा दिल्या नाहीत तर आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत ते बंडाचे निळे निशाण फडकवतील असा इशारा आरपीआयचे गावपातळीवरील व राज्य पातळीवरील कार्यकर्त्यांनी दिला आहे जर जागा सोडणार नसणार तर मित्र पक्षाचे कोणत्याच उमेदवारांचा प्रचार तर करणार नाहीच पण मतदान करणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आता पर्यंत मित्र पक्षांनी वापरा व सोडून द्या अशी वागणूक दिली आहे त्यामुळे यावेळी आरपीआयला सन्मानाने दोन जागा सोडून त्या निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी मागणी केली आहे महाराष्ट्रात आरपीआय आठवले गट ज्यांचे बरोबर निवडणुकीत रहातो त्यांची सत्ता कायम असते हा राजकीय सत्तांतर इतिहास राहिला आहे पश्चिम महाराष्ट्रात आरपीआय मजबूत स्थितीत आहे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत आरपीआय कार्यकर्ता प्रगल्भ व जागरूक झाला आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता सुजाण आहे वैचारिक परिवर्तनवादी विचारांची जबाबदारी संपूर्णपणे त्यांनी स्विकारली आहे आरपीआय आठवले गटाला जागा वाटपात हेतुपुरस्सर डावलून जर आरपीआयला केवळ मतदान पुरते गृहीत धरले तर मात्र बंडखोरी मुळे मित्र पक्षाच्या अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाची धूळ चाखायला मिळेल तसेच अनेक जागा हातून जातील याची नोंद घ्यावी असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा