Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ मार्च, २०२४

*खासदार निधीचा १०० टक्के खर्च विविध विकास कामावर केला---खासदार, ओमराजे निंबाळकर*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

धाराशिव- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार झाल्यानंतर १०१९ ते २०२४ या काळामध्ये विविध विकास कामांसाठी उपलब्ध झालेला १७ कोटी २२ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला असून तो शंभर टक्के खर्च केला असल्याची माहिती खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.



 पुढे बोलताना खा राजेनिंबाळकर म्हणाले की, २०१९ ते २०२४ या काळात धाराशिव लोकसभा मतदार संघाचा लोकसभा सदस्य म्हणून जनतेच्या आर्शीवादाने सेवा करण्याची संधी मिळाली. माझ्या लोकसभा मतदार संघात १५ मोठी शहरे असून लहानमोठी अशी जवळपास १४०० गावे येतात व या शहरात व ग्रामीण अनेक ठिकाणी विकास कामाची मागणी येत आहे. लोकसभा सदस्यासाठी   प्रत्येक वर्षी खासदार निधी ५ कोटी असतो, धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या विविध विकास कामाच्या प्रतीवर्ष ५ कोटी प्रमाणे ५ वर्षाचा खासदार निधी रुपये २५ कोटी येणे आवश्यक होते. मात्र मला मतदार संघातील विविध विकास कामासाठी केवळ १७ कोटी २२ लक्ष एवढा निधी प्राप्त झाला त्यापैकी मला कोराना काळातील २०२०-२१  या वर्षातील ५ कोटी व २०२१-२२ या वर्षातील ३ कोटी असे एकून ८ कोटी रुपये इतका निधी प्राप्त झाला नाही. मतदार संघातील  गावाची संख्या पाहता व सर्व सामान्य नागरीकांच्या विविध विकास कामासाठी असलेली मागणी याचा विचार करता अनेक विकास कामे करण्यास निधीची कमतरता जाणवली असल्याचे त्यांनी सांगितले.  

.......................................

खा राजेनिंबाळकर यांनी केलेल्या विकास कामांचे नाव व निधी रक्कम पुढीलप्रमाणे -------    

........................................    

सभामंडप बांधण्यासाठी३ कोटी ८० लाख रुपये, रस्ते करण्यासाठी ४ कोटी १३ लाख रुपये, पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी ८५ लाख रुपये, विंधन विहीर व पंप व पाईपलाईन करण्यासाठी ९२ लाख रुपये, आर. ओ प्लॅन्ट बसवण्यासाठी ४० लाख रुपये, चौक सुशोभीकरण करण्यासाठी ५३ लाख रुपये, कोरोना काळात यंत्र सामग्री खरेदी करण्यासाठी २५ लाख रुपये, शासकीय रुग्णालय रुग्णवाहीका खरेदी करण्यासाठी १५ लाख रुपये, प्रवाशी निवारा शेड उभारण्यासाठी ६१ लाख रुपये, हायमस्ट बसविण्यासाठी६६ लाख रुपये, व्यायामशाळा बांधकाम व साहित्य खरेदी करण्यासाठी ८० लाख रुपये व इतर अनुषंगीक कामांसाठी ४ कोटी १२ लाख रुपये असा एकूण १७ कोटी २२ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा