*उपसंपादक---नुरजहाँ शेख*
*टाइम्स 46 न्युज मराठी
माळशिरस तालुक्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या माध्यमातून सातत्याने विविध यशस्वी प्रयोग करून सोलापूर जिल्ह्याची मान उंचावली आहे.तालुक्याचे हे वर्चस्व अबाधित ठेवण्याचे काम पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुढे घेऊन जायचे आहे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी" कादर शेख "यांनी केले.ते अकलूज येथील स्मृतीभवनमध्ये आयोजित केलेल्या माळशिरस तालुका पंचायत समिती आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२१-२२, २२-२४ प्रदान समारंभात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माळशिरस तालुका गटविकास अधिकारी विनायक गुळवे, इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात,सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे,बार्शीचे गटशिक्षणाधिकारी सुहास गुरव,जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी महालिंग नकाते, हर्षवर्धन नाचणे,सायरा मुलाणी उपस्थित होते.
माळशिरस पंचायत समितीच्या वतीने संपन्न झालेल्या पुरस्कार सन्मान सोहळ्यात आदर्श शिक्षक,आदर्श मुख्याध्यापक,शिष्यवृत्ती,नवोदय,एनएमएमएस परीक्षातील मार्गदर्शक शिक्षक,आदर्श खेळाडू शिक्षक,विशेष शिक्षक,विषय साधन व्यक्ती यांना प्रशस्तीपत्रक आणि सन्मान ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी विविध दाखल्यातून शिक्षकांच्या श्रेष्ठत्वाची महती सांगत शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.प्रारंभी गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार करडे यांनी प्रस्ताविकातून सर्वांचे स्वागत केले.पुरस्कार्थिंच्या वतीने दिलीप मुळे आणि सोफिया शेख यांनी मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व केंद्रप्रमुख,शिक्षक संघटना समन्वय समिती सदस्य,समूह साधन केंद्राचे समन्वयक आदींनी परिश्रम घेतले.दोन वर्षांच्या खंडानंतर होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पुरस्कार्थी शिक्षकांचे नातेवाईक,विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम गुजर आणि सुहास उरवणे यांनी केले.
चौकट
*माझ्या सेवेची सुरुवात उपशिक्षक म्हणून माळशिरस तालुक्यातील वाफेगावमधून झाली.तेव्हापासून माळशिरस तालुका दर्जेदार शैक्षणिक कामकाज आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाची प्रयोगशाळा आहे.*
*कादर शेख,* *शिक्षणाधिकारी,सोलापूर*
*माळशिरस तालुक्यातील शिक्षक कला मंचच्या टीमने दर्जेदार भक्तिगीते,देशभक्तीपर गीते,भावगीते सादर करून कार्यक्रमाची रंगत-संगत आणि उंची वाढविली त्याची कौतुकास्पद दखल सर्वच मान्यवरांनी मनोगतातून घेतली.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा