Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १३ मार्च, २०२४

*"सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील" अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये -रस्ता सुरक्षा चिन्ह- जनजागृती अभियानाचे उद्घाटन संपन्न*


 *अकलुज -----प्रतिनिधी*

*केदार ----लोहकरे*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

         येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर,अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवरत्न वेलफेयर ट्रस्ट अकलूज व यशवंतनगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. १३ मार्च २०२४ रोजी रस्ता सुरक्षा चिन्ह जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन व रस्ता सुरक्षा चिन्हाचे उद्घाटन अकलूज येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अश्विनी जगताप व सोनाली घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट अकलूजच्या अध्यक्षा सौ.वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील व यशवंतनगर ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.वर्षा सरतापे, यशवंतनगर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजय नवले,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, कार्यालयीन अधीक्षक शब्बीर शेख आदी उपस्थित होते. 



             यावेळी अश्विनी जगताप यांनी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा जनजागृती बाबत चिन्हांची माहिती दिली.तसेच सोनाली घाडगे यांनी विद्यार्थ्यांना परिवहन क्षेत्राविषयी व मोटार वाहन चालवण्याबाबत रस्त्याच्या नियमांची माहिती दिली.तसेच शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट अकलूजच्या अध्यक्षा सौ.वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा जनजागृती विषयी मार्गदर्शन केले.या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमांसाठी महाविद्यालयामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



      हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. सागर फुले यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन कु.मीनाक्षी राऊत तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी विजय नवले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा