*अकलुज -----प्रतिनिधी*
*केदार ----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या उत्कर्ष महोत्सवाचे सराव शिबिराचे आयोजन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शंकरनगर अकलूज येथे ९ मार्च ते १५ मार्च या कालावधीत केलेले असून विद्यापीठाचा संघ रोज कसून सराव करत आहे.हा महोत्सव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या ठिकाणी १७ ते २० मार्च यादरम्यान होणार आहे.या महोत्सवात नृत्य,नाट्य,संगीत ललित कला,शोभायात्रा,वांडमय
या विभागाच्या स्पर्धा होणार आहेत.तसेच आजपर्यंत पथनाट्य,समूहगीत,भारुड, संकल्पना नृत्य,वकृत्व,निबंध, काव्यवाचन,भित्तीचित्रे,अहवाल लेखन याची जोरदार तयारी सुरू असून
यासाठी प्रा.पंकज पवार, आकाश साठे,बुद्धभूषण साळवे, विशाल चव्हाण प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.तर संघव्यवस्थापक डॉ.अनिल लोंढे (विभागीय समन्वयक माळशिरस विभाग ) काम पाहत आहेत तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.देशपांडे सर,प्रा.सौ.श्रेया देशमुख मॅडम व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
या सर्वांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे तसेच विद्यापीठाचे संचालक डॉ.राजेंद्र वडजे सर,जिल्हा समन्वयक डॉ.वीरभद्र दंडे सर यांचं विशेष मार्गदर्शन लाभलेलं आहे.यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,सर्व संचालक,पदाधिकारी यांनी या संघाचे कौतुक करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा