*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मार्च एंड च्या नावाखाली व्यापारी कशाप्रकारे फायदा उचलतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे "गुटखा"
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री कै. आर, आर, पाटील. यांच्या काळापासून आज तागायत महाराष्ट्रात गुटखाबंदी असून या गुटखाबंदीच्या नावाखाली "सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांना चरण्यासाठी कुरण च उपलब्ध करून दिले की काय? असे बोलले जात आहे विशेषतः महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी असताना सुद्धा कर्नाटक च्या सीमावर्ती भागातून गुटखा महाराष्ट्र राज्यात येतोच कसा हा संशोधनाचा प्रश्न आहे ? शिवाय वेळोवेळी गुटखा वाहतुक करणाऱ्या गाड्या पकडून कारवाई करत असतात तरी राज्यात गुटखा येतच आहे. या गुटखा बंदी च्या नावाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंथली रक्कम दिली जाते? त्यामुळे होलसेल व्यापाऱ्यांना कोणाचाही धाक नसून" सरळ सरळ म्हणतात- जा कोणाला सांगायचे ते सांग काय करायचे ते कर- आमचे कोणीही काँही करु शकत नाही" एवढ्या पर्यंत या होलसेल आणि रिटेल व्यवसायकांची मजल गेली असून मार्च एंड आणि शॉर्टेज नावाखाली पाच रुपयाला विकला जाणारा गुटखा आज दहा रुपयाला विकला जात आहे मुळातच गुटखाबंदी असताना हा उपलब्ध होतोच कसा ?इतर जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानात सुद्धा सहजपणे प्रत्येक कंपनीचा गुटखा उपलब्ध होत आहे शिवाय अकलूज आणि परिसरातील कोणत्याही पान दुकानासमोर पहा गुटखा शौकिनाने गुटखा खाऊन टाकलेले पाऊच निदर्शनास येतात शिवाय शासकीय कार्यालयाच्या भिंतीच्या कोपऱ्यात सर्रास गुटखा शौकिनानी गुटखा खाऊन भिंती रंगवलेल्या दिसून येत आहेत तर काही शासकीय कर्मचारी पान टपरीवर गुटखा खाताना दिसून येत असतात मग गुटखाबंदीचा फार्स कुणासाठी.?. की शासकीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी आहे का ?असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे जर शासकीय अधिकाऱ्यांकडून कायद्याचे पालन होत नसेल तर कायद्याचा धाक घोरगरिबासाठीच आहे कां? हे संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे
वास्तविक पाहता सर्वत्र लहान लहान मुले सुद्धा लहान वयातच व्यसनाधीन बनत असल्यामुळे देशाचे भवितव्यास धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही
विशेषतः पोलीस प्रशासनाची गाडी प्रत्येक पान टपरी समोर येऊन प्रत्येक महिन्याला मंथली घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे "तेरी भी चूप मेरी भी चुप "असा प्रकार घडत असून याच्या संबंधित खाते याकडे लक्ष देऊन गुटखा विक्रेत्यावर कारवाई करणार का? असे नागरिकांतून बोलले जात आहे
वेळप्रसंगी घरी लहान मुलांना दूध नसेल तर गुटखा शौकीन मुलाला दूध घेऊन जात नाही मात्र दहा रुपयाचा गुटखा तोंडात चघळत घरी जात असतो याला काय म्हणावे ?ज्याप्रमाणे "मांजर डोळे झाकून दूध पीत असतो त्याला वाटत असते की माझ्याकडे कोणी पाहत नाही परंतु मांजराला माहीत नसते की सर्व जग त्याच्याकडे पाहत असतो" असा प्रकार या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा असून राजरोसपणे गुटखा व्यापऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम होत आहे तरी या गुटखा व्यापाऱ्यावर कारवाई होणार का? हे पाहणे गरजेचे आहे!
विशेष टीप
या गुटक्याच्या न्यूज नंतर संबंधित पत्रकाराला दमदाटी देणे अथवा दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे हे माञ ञिवार सत्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा