*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र शासनाकडून माढा तालुक्यातील विविध योजनेअंतर्गत रस्ते काम चालू आहेत. त्या रस्त्याची कामे अत्यंत बोगस व निष्कृष्ट दर्जाची सुरू असल्याने ही कामे थांबवावेत व याची सकल चौकशी करण्याची मागणी जनशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे केली होती. अन्यथा हलगीनाद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आचारसंहिता असल्याने आंदोलन करता येणार नसल्याने सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बाळासाहेब जाधव यांनी मध्यस्थी करून सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता संजय माळी व कार्यकारी अभियंता हनुमंतकुमार चौगुले यांच्याशी बैठक लावल्यानंतर त्यांनी दिलेले लेखी उत्तर पाहता आपण या रस्त्या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे "अतुल खूपसे पाटील" यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, माढा तालुक्यातील होत असलेली कामे ही अत्यंत निष्कृष्ट दर्जाची सुरू आहेत. शिवाय ठेकेदार यांची बीड कॅपॅसिटी तपासणी गरजेचे असताना ठेकेदारांची हात मिळवणी करून कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी ठराविक ठेकेदारांना ही कामे दिली आहेत.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, ऑनलाईन बीड कॅपॅसिटी व मॅनपॉवर बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही प्रशिक्षण दिले नसल्याने ते निविदा भरणेपासून वंचित राहू शकतील किंवा निविदेमध्ये अपात्र होतील असे सांगितले आहे. म्हणजे याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाला ठेकेदारांची अत्यंत काळजी पडली आहे. रस्त्याचा दर्जा आणि क्वालिटी याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही. शिवाय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने ही प्रक्रिया उरकून घेतल्याची त्यांनी सांगितले, याचा अर्थ असा होतो की आचारसंहिता सुरू व्हायच्या अगोदर निविदा झाली म्हणजे पुन्हा बीड कॅपॅसिटी लागू होण्याची शक्यता असते. म्हणून हा नियोजित डाव रचून ठेकेदाराशी संगणमत करून केलेला कार्यक्रम असल्याचा आरोप -अतुल खूपसे पाटील- यांनी केला.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंतांच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे अतुल खूपसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
याप्रसंगी बीबीषण शिरासत, विनोद घंटे, रवी पुजारी, शर्मिला नलवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा