शेतात खुरपणाऱ्या महिलेला मी विचारले ?
बाई ग आज महिला दिन आहे,माहित आहे का तुला?
त्यावर हातातलं खुरप न थांबवता ती थोड हसून म्हणली,
काय असतंय ते महिलादिन
माहित नाही मला
आमच्याकडं नाही उगवत ..
थोडा वेळ विचार करून ती म्हणाली
बैलपोळा असतो तसा महिलांचा पण पोळा असतो का हो ?
मी तिच्या प्रशावर नि शब्द झाले.
खुरप्याने तन बाजूला करीत
ती पुन्हा बोलली
एक दिवस बैलांना आराम मिळतो
पण महिलांना कामातून सुट्टी मिळते का हो ?
बैलांना सजवून गोडधोड खाऊ घालतात .
पण महिलांना कोणी पुरुष म्हणतो का हो ?
आज तु निवांत बस... मी करीन सर्व तुझी कामे...?
शहरात उगवत असेल हो महिलादिवस
पण खेड्यापाडयात अजून
उगवत नाही .....
महिला दिवस ..
कवियत्री - नूरजहाँ फकृद्दीन शेख , गणेशगाव ता.माळशिरस
जी सोलापूर.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा