श्रीपूर ---बी.टी. शिवशरण
अतिशय सुसज्ज भव्य परिसर व मनाला भुरळ पाडणारे देखणी हिरवळ आज महाशिवरात्री निमित्त अकलूज शंकरनगर येथे महाशिवरात्र यात्रा महोत्सव सुरू आहे पहाटे पासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे शिवरात्र यात्रा महोत्सव समीतीचे वतीने यात्रेत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात गर्दीने फुलून गेला आहे यात्रेत पारंपरिक खेळणी दुकाने मोठे झुलते पाळणे मिठाईची दुकाने थाटली आहेत यावर्षी जनावरांचा बाजार कमी भरल्याची चर्चा आहे कारण सध्या शेती आधुनिक व यांत्रिक पद्धतीने केली जाते त्यामुळे खिलार जनावरांना मागणी कमी प्रमाणावर राहिली आहे दरवर्षी यात्रेचे खास आकर्षण म्हणजे तमाशा दरवर्षीप्रमाणे या वर्षीही यात्रेत लोकनाट्य तमाशाने हजेरी लावली आहे रहदारी व वहातुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन यांना कारखान्याचे सुरक्षारक्षक सहकार्य करत होते अकलूज शंकरनगर परिसर महाशिवरात्र यात्रामय झाला आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा