Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

*अजमेरा आणि JSW कंपनीची गुंडगिरी थांबवा अन्यथा.... कंपनीच्या विरोधात उपोषण करणार---- अमोल शिवाजी जाधव*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो. 9730 867 448

                अजमेरा आणि JSW कंपनीने शेतकऱ्यांच्या वावरातून शेतकऱ्यावर गुंडगिरी करून त्यांच्या शेतातून वाहने घेऊन जात आहेत वडगाव लाख ते खंडाळा रस्ता अतिक्रमण झालेला असून या कंपनीची गुंडगिरी व दडपशाही न थांबल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे अमोल शिवाजीराव जाधव यांनी तुळजापूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे.



 याबाबत निवेदनात दिलेली तक्रार अशी आहे की अजमेरा कंपनीकडून खाणकाम चालू असून वडगाव खंडाळा शिवरस्ता असून तो वडगावच्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीची शेती देऊन हा रस्ता केला आहे अजमेरा कंपनीने तिथे शेती विकत घेऊन तो रोड वडगाव शिवारात ढकलला आहे शिवरस्ता बुजवून अतिक्रमण केले आहे JSW यांनी शेतकऱ्यांना विश्वासात व विचारात न घेता कंपनीने गुंडशाही आणि दडपशाही करून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक रस्त्यातून वाहने घेऊन जात आहे तरी शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून रस्त्याची मोजणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि आपण तात्काळ दोन्ही कंपनीवर कायदेशीर कारवाई न केल्यास आम्ही सर्व शेतकरी आमरण उपोषणास बसणार असल्याचे अमोल शिवाजीराव जाधव यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे



 आधिक माहितीस्तव या निवेदनाच्या प्रती १) जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव २)पोलीस निरीक्षक अधिकारी धाराशिव ३) खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव ४)पोलीस निरीक्षक तुळजापूर पोलीस स्टेशन आदींना दिले असून या निवेदनावर अमोल शिवाजीराव जाधव, अलका सुरेश कापसे , दीपक चौफदार, सुनील गणपतराव औटी, इत्यादी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा