*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
तुम्ही मला फक्त दहा हजार रु.चा धनादेश नव्हेत तर माझ्यासाठी जणु दहा हत्तीचे बळ असुन तुम्ही मला कष्टाचे पैसे दिलेत त्यामुळे आपले यश हे निश्चितआहे अशी भावना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांने त्यांना दिलेल्या 10 हजार रु मदती च्या धनादेश दिल्यानंतर व्यक्त केली
धाराशिव मतदारसंघात जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी लढत होत आहे. धनशक्तीला जनतेच्या बळावर रोखण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर मैदानात आहे, ही निवडणुक सामान्य जनतेच्या अतुट साथीमुळे आता जनतेचीच झाली आहे. त्याचे बोलकं उदाहरण आज ओम दादांना अनुभवयला मिळाले. शिवराज नानाभाऊ नांगरे नावाच्या सामान्य शेतकरी बांधवाने निवडणूकिसाठी चक्क दहा हजार रुपयाचा धनादेशच दिला आहे. ही फक्त दहा हजाराची रक्कम नसुन या लढाईसाठी मला दहा हत्तीचे बळ देणारी बाब आहे. निवडणुकीच्या काळात हे उदाहरण सकारात्मक आहे. दादासाठी तर हा अत्यंत भावनिक करणारा क्षण आहे. शेतकरी बांधवाने केलेली मदत ही देशाची लोकशाही वाचविण्यासाठी टाकलेले पाऊल मानले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा