Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

*जबरी चोरी (चैन स्नॅचिंग) च्या गुन्ह्यातील "हवा असलेला" आरोपी पुणे शहर युनिट 3- च्या जाळ्यात*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


दिनांक २४/०४/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट 3 कडील अंमलदार पाहिजे / फरार /तडीपार आरोपींचा शोध घेत असताना सिंहगड रोड पो स्टे गु.र. नं २४३९/२०२० भादवि कलम ३९२,४४१,५०६,३४ सह आर्म ऍक्ट ४(२५) मपोका कलम ३७(१)१३५ या गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे विशाल सज्जन फाळके रा. मुक्काम पोस्ट वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली हा शिवाजीनगर कोर्ट च्या बाहेर मेट्रो स्टेशन जवळ उभा असल्याची माहिती "स.पो.फौ.संतोष क्षीरसागर व पोलीस अंमलदार 8761 ज्ञानेश्वर चित्ते "यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. सदर बाबत वरिष्ठांना यांना कळविले असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले. त्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता वर नमुद गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी हा सदर ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील चौकशी कामेयुनिट 3 कार्यालयात आणून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव, पत्ता "विशाल सज्जन फाळके रा. मुक्काम पोस्ट वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली "असे सांगितले.त्यास अधिक विश्वासात घेऊन वरील दाखल गुन्ह्याबाबत त्याचेकडे चौकशी करता सदरचा गुन्हा हा त्याने केला असल्याची कबुली दिली. 


          सदर आरोपीची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाईकामी सिंहगड रोड पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे ताब्यात रिपोर्टाने देण्यात आले आहे. 

          

          (श्रीहरी बहिरट )

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक

गुन्हे शाखा, युनिट 3पुणे शहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा