*विशेष----प्रतिनिधी*
*राजु (कासिम)मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
आपल्या हवामान अंदाजासाठी राज्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय पंजाब रावांनी नुकताच एक हवामान अंदाज दिला आहे. या हवामान अंदाजानुसार येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पावसाला पोषक परिस्थिती तयार होणार असे चित्र आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार गेले आहे.
काही ठिकाणी तर 42 आणि 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होत आहे हे विशेष. यामुळे नागरिक उकाड्याने अक्षरशः हैराण झाले आहेत. आता मात्र उकाड्याने हैराण झालेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
कारण की, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सात तारखेपासून पावसाला सुरुवात होणार असून त्यापुढील सहा दिवस महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत राज्यात काही ठिकाणी गारपीट देखील होणार असा अंदाज त्यांनी दिलेला आहे. यामुळे आता आपण राज्यात गारपीट कुठे होणार याबाबत पंजाबरावांनी काय म्हटले आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणताय पंजाबराव डख ?
खरेतर, भारतीय हवामान विभागाने आजपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे. पाच एप्रिल ते आठ एप्रिल पर्यंत राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.
खानदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
पंजाब रावांनी देखील सात एप्रिल पासून अर्थातच येत्या दोन दिवसांनी महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असे म्हटले आहे.
सात एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या कालावधीत पूर्व विदर्भातील काही भागात गारपीट होणार असे त्यांनी म्हटले आहे.
एवढेच नाही तर पश्चिम विदर्भात देखील चांगला जोरदार पाऊस होऊ शकतो असे यावेळी त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांना विशेष सावध राहावे लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा