Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

*सोलापूर येथील आबा कांबळे खून प्रकरणी गामा पैलवान सह सात आरोपीना जन्मठेपेची शिक्षा..*

 


प्रतिनिधी----एस.बी. तांबोळी

टाइम्स 45 न्युज मराठी

सोलापूर - संपूर्ण शहरामध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरलेल्या आबा कांबळे खून प्रकरणात सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शस्त्र कायदा अधिनियम व जमाव जमवून खून करणे याप्रकरणी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी खून प्रकरणातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. प्रदिपसिंह राजपूत तर आरोपी पक्षाच्या वतीने ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीकांत जाधव, ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. झुरळे यांनी काम पाहिले.

    याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आबा कांबळे यास सन २००४ मध्ये ऋतुराज शिंदे याच्या खुनाच्या गुन्हयात अटक करण्यात आली होती. सदर गुन्हयाच्या खटल्यात आबा कांबळे याच्यासह एकूण १० जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर सन २०१४ मध्ये आबा कांबळे हाय कोर्ट, मुंबई येथून सुटला होता. जेव्हा पासून आबा कांबळे जेलमधून सुटुन आला होता तेव्हापासून रविराज शिंदे अधुनमधून फिर्यादी याने घरासमोर मोटार सायकलवरुन चकरा मारत होता. तसेच आबा कांबळे यास रागाने बघुन इशारे करुन जात होता. घटनेच्या सुमारे एक महिन्यापुर्वी फिर्यादीचा मामा आबा कांबळे व फिर्यादी शुभम धुळराव रात्री जेवन करुन घरासमोरील कटटयावर रात्री ११ चे आसपास बसले असता आरोपी रविराज शिंदे व सुरज साळुंके असे दोघे मोटार सायकलवरुन फिर्यादीवे घरासमोरुन गेले. त्यावेळी आरोपी रविराज शिंदे याने फिर्यादीचे मामा आबा कांबळे यास तुला बघुन घेतो, तु जास्त दिवस राहणार नाही असे म्हणुन त्यांच्या समोरुन मोटार सायकल जोरात रेस करून निघुन गेला. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी रात्री घराच्या समोर कटटयावर बसले असता आरोपी रविराज शिंदे हा मोटार सायकल वरुन एकटाच येवून फिर्यादीचे मामा आबा कांबळे यांना त्याचे हातातील हत्यार दाखवुन खुन्नस देवून निघून गेला होता. त्यामुळे आबा कांबळे याचा खून सदर आरोपीनी ऋतुराज शिंदे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केला आहे अशा आशयाची फिर्याद फिर्यादीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथे दि. ०८/०७/२०१८ रोजी दिली होती. सदरचे बाबतीत मयताचा भाचा शुभम श्रीकांत घुळराव याने दि.०८/०७/२०१८ रोजी फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर येथे सदर सर्व आरोपींविरूध्द फिर्याद दिली असता, पोलीसांनी सर्व आरोपी विरूध्द गु.नों.क.३९९/२०१८, भारतीय दंड विधान कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, १२०-ब तसेच भारतीय हत्यार कायदा, कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केलेला होता. तद्नंतर सदर गुन्हयाचा तपास पोलीरा निरीक्षक संजय जगताप यांनी केला. दरम्यानच्या काळात मयत हा अनुसूचित जाती-जमातीचा असल्याने, सदर प्रकरणात सदर कायदयाअंतर्गत कलम वाढ करण्यात आली. तद्नंतर सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस आयुक्त डॉ. दिपाली काळे यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण झाल्यानंतर संबंधीत अधिकारी यांनी सर्व आरोपींविरूध्द मा न्यायालयामध्ये दि.०२/१०/२०१८ रोजी दोषारोपपत्र दाखल केलेले होते.

    सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण २८ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच सदर प्रकरणात ८ कोयते, ३ मोटारसायकल आणि ६ मोबाईल फोन हे जप्त करण्यात आले होते. विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी खून प्रकरणातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व नातेवाईक मोठ्या संख्येने कोर्टाच्या आवारात उपस्थित होते. तर सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे, रविराज दत्तात्रय शिंदे, अभिजीत उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे, प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे, निलेश प्रकाश महामुनी, तैसिफ गुडूलाल विजापुरे व नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

   मा. न्यायालयाने सरकारपक्षाने सादर केलेला युक्तीवाद ग्राहय धरून, सदर गुन्हयातील आरोपी क. १ सुरेश उर्फ नामा अभिमन्यु शिंदे, क्र.२ रविराज दत्तात्रय शिंदे, क. ३ अभिजीत उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे, क्र. ४ प्रशांत उर्फ आण्णा पांडूरंग शिंदे, क. ५ निलेश प्रकाश महाभुणी, क. ६ तौसिफ गुड्डूलाल विजापूरे, क. ७ विनित उर्फ इश्वर भालचंद्र खाणेरे यांना भा.दं.वि., कलम ३०२ अन्वये प्रत्येकास जन्मठेप व दंड रक्कम रू. १०,०००/-, सदर दंड न भरल्यास, ३ महिन्यांची शिक्षा तसेच भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये प्रत्येकी १ वर्ष शिक्षा व दंड रक्कम रु.२,०००/-, सदर दंडाची रक्कम न भरल्यास, १ महिन्याची शिक्षा, भा.दं.वि., कलम १८८ अन्वये १ वर्ष शिक्षा व दंड रक्कम रु. ५,०००/ सदर दंडाची रक्कम न भरल्याम, १ महिन्याची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.



    सदर शिक्षेच्या सुनावणी वेळी सरकार पक्षातर्फे पुन्हा युक्तीवाद करण्यात आला की, सदर आरोपींनी मयताचा तरुण वयात क्रूरपणे खून केलेला आहे. सदर मयताची तरूण पत्नी ही विधवा झालेली आहे. सदर मयतास एक छोटा गुलगा असून, आरोपींनी केलेल्या कृत्यामुळे मयताची पत्नी व मुलगा हे त्यांचे दैनंदिन गरजा भागवू शकत नाहीत व त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे, यातील आरोपींना प्रत्येकी रक्कम रु.२,००,०००/- दंड ठोठाविण्यात यावा तसेच सदरचा खटला हा दुर्मिळ स्वरूपाचा असल्यामुळे, यातील आरोपींना फाशी न देता, जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात यावी.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा