*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे पाटलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील हे दोन दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर होते, पण तब्येत बिघडल्यामुळे त्यांना संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांना उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागलं होतं, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालवली. धाराशिवचा दौरा अर्धवट सोडून त्यांना छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आलं आणि रुग्णालयात नेलं. मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या सलाईन लावून उपचार सुरू आहेत. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे पाटलांना ऍडमिट करण्यात आलं आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा