Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २ एप्रिल, २०२४

*वेळापूर महावितरण उप विभागातील जनमिञांनी उत्कृष्ट थकबाकी वसुली केल्याबद्दल सत्कार*


 

*दसूर प्रतिनिधी*

*संजय निंबाळकर*

*टाइम्स 45 न्युज मराठी

. कार्यकारी अभियंता काळे व उपकार्यकारी अभियंता बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीपूर शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सूळ वेळापूर शाखा कार्यालयाचे सहाय्य्क अभियंता डोळे पिलीव शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता . थोरात , बोडले शाखा कार्यालयचे कनिष्ठ अभियंता भोई वेळापूर शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता कदम यांच्या मार्गदर्शना खाली वेळापूर उपविभागातील जनमित्रांनी उत्कृष्ठ थकबाकी वसुली केल्याबद्दल सर्व जन्मीत्राचा भव्य सत्कार करण्यात आला.



   यामध्ये ज्या जनमित्रांनी आपल्या भागातील विज बिल थकबाकी शून्य केली आहे अशा जनमित्रांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले, तसेच बाकी सर्वांना सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला.

  वेळापूर उपविभागातील सर्व शाखा अभियंता व सर्व जनमित्रांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता बोधे यांचा उत्तम प्रकारे टीम नेतृत्व केल्या बद्दल सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा