Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

*हजरत बागसवार (र.अ) यांच्या ऊस निमित्त अन्नदान कार्यक्रम आणि विशेष मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न*

 


*विशेष----प्रतिनिधी*

*राजु (कासिम)मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

हजरत राजबाग सवार (रह.) यांच्या उर्स निमित्त दर्गा मस्जिद जमात तर्फे भव्य अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला

           सालाबाद प्रमाणे या ही वर्षी हजरत पिर राजबाग सवार (रह.) यांच्या उर्स निमित्त दर्गा मस्जिद जमात तर्फे उर्स साजरा करण्यात आला प्रथम हजरत पिर राजबाग सवार (रह.) च्या मजार वरती चादर चढवुन हजरत चे वंशज यांनी बस्वकल्याण वरुन विडीयो कॉन्फरन्स दोरे फातिहा दिली नंतर अन्नदानास सुरुवात करण्यात आली 




             विशेष म्हणजे अकलूज येथील माजी उपसरपंच -"पांडुरंग भाऊ देशमुख" यांचे समर्थक आणि अकलूज शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, सर्वधर्म समभावाचे अनुकरण करणारे--" सुरेश भाऊ गंभीरे" हे वयाच्या 28 व्या वर्षापासून ते आज तागायत निरंतर दरवर्षी रमजान चे एक महिन्याचे रोजे करत असतात गंभीरे हे रोजे करतात हे त्यांनी आज तागायत कोणाला सांगितले नव्हते मात्र हळूहळू यांचे आध्यात्मिक कार्य अकलूज मधील सर्वांना समजत गेले त्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना या हजरत ख्वाजा राज बागसवार यांच्या ऊस निमित्त दर्गाह मस्जिद जमात च्या वतीने व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला .

तसेच या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आसलेले जोशी समाजाचे ज्येष्ठ नेते वसंतदादा वायकर .ज्येष्ठ पत्रकार संजय लोहकरे,सामाजिक कार्यकर्ते हामिदभाई मुलाणी, नाजीम खान 

यांचा दर्गा मस्जिद जमाती तर्फे सत्कार करण्यात आला

 या कार्यक्रमासाठी असंख्य रोजदार रोजा इफ्तार साठी उपस्थित होते 



या कार्यक्रमांसाठी दर्गा मस्जिद जमातीचे .हुसैन शेख. बादशाह भाई शेख, सलिम सय्यद, राज अली मुलाणी,इन्नुस शेख, रशिदशेख, कलिम फकीर, इब्राहिम मुलाणी,सुरज मुलाणी, रियाज तांबोळी इब्राहिम मुजावर. यांनी विशेष परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा