Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ७ एप्रिल, २०२४

भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे - आमदार यशवंत माने

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

- भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे व त्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यास सहकार्य करावे असे आवाहन आमदार यशवंत माने यांनी केले.



    पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ व घोंगडी बैठक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हनुमंत कोकाटे, माजी सभापती प्रशांत पाटील, श्रीमंत ढोले, महादेव घाडगे, बापूराव शेंडे, अतुल झगडे, दत्तात्रय घोगरे, नवनाथ रूपनवर, धैर्यशील पाटील, संग्रामसिंह पाटील, श्रीकांत बोडके, अशोक बोडके, सुदर्शन बोडके, संतोष सुतार, अभिजित तांबीले आदिसह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.



     आमदार माने पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील 35 वर्षात आपल्या सार्वजनिक जीवनात सर्वाधिक वेळ सर्वसामान्यांच्या कामासाठी देवून वेगवान विकास घडवला त्याच पद्धतीचा विकास या पुढील काळात घडवण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा पवार यांना विजयी करा असे आवाहन केले. 

    कार्यक्रमाची प्रस्ताविक माजी सरपंच श्रीकांत बोडके यांनी केले यावेळी प्रशांत पाटील, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे आदींची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सुतार यांनी केले तर आभार संतोष सुतार यांनी मानले.

    महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ निरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यानंतर टनू, गिरवी, गोंदी, लुमेवाडी, सराटी आदी गावामध्ये घोंगडी बैठका घेण्यात आल्या.

फोटो - पिंपरी बुद्रुक येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात उपस्थितांसमोर बोलताना आमदार यशवंत माने.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा