Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ७ एप्रिल, २०२४

*अकलूज येथील" बागवान सहारा फाउंडेशन "च्या वतीने सामुदायिक विवाहाचे आयोजन*

 


*विशेष----प्रतिनिधी*

*राजु (कासिम)मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी


अकलूज येथील बागवान सहारा फाउंडेशन च्या वतीने रविवार दिनांक 12 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता "आनंदी गणेश मंगल कार्यालय-- आनंद नगर ,अकलूज ,ता. माळशिरस जि. सोलापूर येथे सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी समाजातील बांधवांनी या सामुदायिक विवाहासाठी नोंदणी करून सहभाग घ्यावा असे आवाहन "बागवान सहारा फाउंडेशन" च्या वतीने करण्यात आले आहे



       आपल्या मुला मुलींचे विवाह साध्या पद्धतीने साजरे करा असा उपदेश" प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांनी दिला असून त्यांच्या या उपदेशाचे अनुकरण करत "बागवान सहारा फाउंडेशन अकलूज "यांनी 'निकाह को आसान करे 'हे ध्येय घेऊन सामुदायिक विवाहाचे आयोजन केले असून या विवाहासाठी ज्या समाज बांधवांना आपल्या मुला मुलीचे विवाह यामध्ये करायचे आहेत त्यांनी पोम्प्लेट मधील मोबाईल नंबर वर संपर्क साधून नावे नोंवावीत, तसेच या सामुदायिक विवाह साठी काही सूचना असून त्या पुढील प्रमाणे;--1)- मुलाचे (नवरदेव) वय 21 वर्षे आणि मुलीचे (नवरी) वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे 2)मुला मुली चा जन्म तारखेचा दाखला व आधार कार्ड आणि दोन दोन फोटो आवश्यक आहेत 3) मुला-मुलीकडील दोन दोन जबाबदार व्यक्तीची आवश्यकता आहे 4 ) विवाहासाठीचे रजिस्टर खर्च जबाबदार व्यक्तीने देणे आवश्यक आहे. तसेच आपापल्या गावातील जमात ची परवानगी असणे आवश्यक आहे 5 ) मुलाकडून 5 हजार रुपये व मुलीकडून 5 हजार रुपये विवाहाचा फिस देणे अनिवार्य आहे

     बागवान सहारा फाउंडेशन कडून   

1)विवाह संपन्न झालेले सर्टिफिकेट 2)सर्व नवरदेवांसाठी एकसारखे फेटे 3) नवरीसाठी पुष्पहार 4)विवाहासाठी येणाऱ्या पै- पाहुणे, मित्रमंडळी व वराडी मंडळीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी ज्यांना आपल्या मुला मुलींची विवाह या सामुदायिक सोहळ्यात करायचे आहेत त्यांनी 30 एप्रिल 2024 पर्यंत नावे नोंदवावीत असे आवाहन बागवान सहारा फाउंडेशन अकलूज यांच्या वतीने करण्यात आले आहे

.

  सुचना ;-- सामुदायिक विवाह मुला मुलींची नावे नोंदवण्यासाठी या पोम्प्लेट मधील मोबाईल नंबर वर संपर्क साधून नावे नोंदवावीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा