*इक्बाल मुल्ला--सांगली
"मृत्यू" हें कटुसत्य असताना,आयुष्य हें क्षणभंगुर आहे हे माहित असताना, संपत्ती -धनदौलत -जागा -आणि सर्व इस्टेट इथेच याच "पृथ्वीतलावर" सोडून जायचे हें माहित असताना, "स्वार्थीपणे" एखाद्याचा हक्क मारून, प्रॉपर्टी हिसकावून*,आणि एखाद्याला "बेघर" करून मिळवलेली जमीन व त्याचा हिशोब त्याच्या मृत्यूनंतर तात्काळ त्यांच्या कब्र मध्ये त्याला द्यावाच लागेल.
एखाद्याचा जनाजा (शवयात्रा) जात असेल आणि त्याचा जनाजा "थांबवून" त्यांचा चेहरा पाहण्याची इच्छा एखाद्याने व्यक्त केली असेल आणि त्या मृत व्यक्तीला तो सांगत असेल , मी जिवंत असताना माझी "प्रॉपर्टी" ,जागा ,बळकावला ,आता मेल्यानंतर ती जागा ,ती प्रॉपर्टी बरोबर घेऊन जात आहात का ??? त्या जागेची कागदपत्रे घेऊन जात आहात का ?? आम्हाला रस्त्यावर ठेवून "बेघर" करून ,तुमची कबर "प्रकाशमान" करत आहात का ???
वास्तवीक ,जनाजा (शवयात्रा)जात असताना,अनोळखी व्यक्तीने ती थांबवून ,तुम्ही आमचे तारणहार होता ,सारथी होता , तुम्ही हितचिंतक होता , तुम्ही "उठा": ,तुम्ही परत या ...असे म्हणायला हवे .
तुमच्या वारसांनी तुमच्या कबर वर येऊन फातेहा वाचायला हवे ,कुराणातील "आयत" वाचायला हवेत. परंतु तुमच्या मृत्यूनंतर तुमचे वारस, नातेवाईक मेल्यानंतर तुम्हाला "शिव्याशाप" देत असतील,तुम्ही तुमची जागा नरकात (जहन्नुम ) मध्ये आहे असे सांगत असेल ,तर तुम्ही स्वतः "करोडपती " असूनदेखील या जगात "भिकारी "आहात.
अपने गुनाहों से "तोबा" करने में कभी "देर" ना करो...
सुना हें ..सोने के बाद कई लोगों की "सुबह" नहीं होती ...
गरीब ,गरजू , ज्यांचा हक्क आहे ,त्या निराधारांची जमीन हिसकावून घेतल्यास ,याच जगात परमेश्वर भयंकर "दुष्परिणाम" दाखवून देईल.
एखाद्याची "मूठभर जागा" हिसकावल्यावर त्याचा वंश नष्ट होतो ,आणि त्याच्या श्रापामुळे ते कुटुंब उध्वस्त होते हें "विधिलिखित" आहे.
एक उदाहरण आहे . एका धनाढ्य बहिणीने एका गरीब भावाचा हक्क मारून "आयुष्य" मजेत घालवले . ती बहीण वृद्ध झाली. जिवापेक्षा जास्त "प्रेम" करणाऱ्या "मुलाने" वाळीत टाकले. नवरा अचानक जग सोडून निघून गेला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एका विहिरीत* त्या बहिणीचा "देह" मिळाला. आणि 8 दिवस कुजलेले, मासे आणि मुंग्यांनी खाल्लेले "अर्धमेले" शरीर "दफन" केले गेले.
वस्तुतः आपण जिवंत असताना लोकांनी आपले कौतुक करायला हवे ,आणि मेल्यानंतर देखील लोकांनी नावं काढले पाहिजे,असे "कार्य" आपल्या हातून झाले पाहिजे.
"जमिनीच्या" छोट्याशा तुकड्यासाठी, गरीबाच्या "तोंडातील घास" हिसकावून, त्यांच्या पोटावर पाय देऊन कोणी "सुखी" होईल का ?? गरिबांची दुवा (आशीर्वाद ) घ्यावेत ,त्यांचे श्राप कधीही घेऊ नयेत. कारण ते तुमच्या मुलांनाही लागतात. "मृत्यूनंतरही" लोकांनी तुमचे "कौतुक" करणे हिच आयुष्यातील खरी श्रीमंती आहे.
धन्यवाद !
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार*)
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा