Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

*देशात 1 एप्रिल 2024 पासून लागू झाला "वन व्हीकल वन फास्ट नियम"*

 


*विशेष----प्रतिनिधी*

*राजु (कासिम)मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी* 

*मो.-84088 17333*


* राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, म्हणजेच NHAI चा ‘एक वाहन एक फास्टॅग’ नियम सोमवारपासून देशभरात लागू झाला. यापूर्वी मार्च महिन्यात हा नियम लागू करण्यात येणार होता, मात्र केंद्राने एक महिन्याचा दिलासा देत याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली होती. 1 एप्रिलपासून मात्र हा नियम लागू झाला आहे.

माहितीनुसार, या नियमामुळे आता एका वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडता येणार नाहीत. ज्या लोकांकडे एका वाहनाशी लिंक असलेले एकाहून अधिक फास्टॅग आहेत, त्यांचे एक सोडून इतर फास्टॅग 1 एप्रिलपासून बंद होतील. आपले इतर फास्टॅग बंद करण्यासाठी, वा त्यातील बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी RBI आणि PPBL ने ग्राहकांना 15 मार्चपर्यंतची मुदत दिली होती.

इलेक्ट्रिक टोल प्रणालीची कार्यक्षमता अधिक सुधारावी आणि टोल प्लाझावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणं किंवा एकाच वाहनाला अनेक फास्टॅग लिंक करणं बंद होणार आहे.

भारतातील सुमारे 98 टक्के वाहनांना फास्टॅग लिंक होऊ शकतं. सध्या देशात 8 कोटींपेक्षा अधिक फास्टॅग यूजर्स आहेत. यामध्ये रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. वाहन टोल नाक्यावर पोहोचल्यानंतर फास्टॅग स्कॅन होऊन, वॉलेटमधून आपोआप टोलची किंमत कापली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा