Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

*शिवछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त* *राजे!तुम्ही नसताना*

 


केले स्वराज्य निर्माण

रयतेच्या सुखासाठी

छत्रपती शिवराय 

उभे जनतेच्या पाठी ॥ १ ॥ 


न्याय निती प्रामणिक

मनी ज्योत स्वराज्याची

सारा मराठा मुलूख 

आस किल्ले जिंकण्याची ॥२ ॥ 


संगे सोबती मावळे 

चर्चा रयतहिताची 

किती वर्णावी महती 

राजा देव माणसाची ॥३ ॥


राजे ! तुम्ही नसताना 

कुठे शोधावा तानाजी

आज दिसेना आम्हां 

शूर पराक्रमी बाजी ॥ ४ ॥ 


राजे ! तुम्ही नसताना 

पराक्रम आठवावा 

शिवनेरी रायगड

डोळ्यांमध्ये साठवावा ॥ ५ ॥


मनी अखंड प्रेरणा 

सांगू किती शौर्यगाथा 

थोर दैवता चरणी

आज टेकविते माथा ॥ ६ ॥


    कवयित्री

 सुवर्णा घोरपडे

संग्रामनगर अकलूज 

   जि.सोलापूर






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा