Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

दादासाहेव फाळके पुरस्काराने बालगंधर्व कला अकादमी परिवारास सन्मानित .

 


नूरजहाँ शेख उपसंपादक

टाइम्स 45 न्यूज मराठी


जागतिक रंगभूमी दिनाच्या पुर्वसंधेला आयोजित दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवार्ड २०२४ ने बालगंधर्व कला अकादमी परिवारास सन्मानित करण्यात आले.नाट्य आणि सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराची बालगंधर्व कला अकादमी मानकरी ठरला आहे.

         नाट्य आणि सिनेसृष्टीतील नवे पर्व,रंगभूमीलाही होई जिच्या वर गर्व,अशी एकमेव कला अकादमी बालगंधर्व अशीच सर्वत्र ख्याती असलेल्या नामांकित अशा बालगंधर्व कला अकादमी परिवार यांना हा पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले,समाजसेविका व भुमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई,जेष्ठ अभिनेते रझा मुराद,दिपक शिर्के यांच्या हस्ते अकादमीचे संचालक किशोर कुमार यांना देण्यात आला.महाराष्ट्रातील सर्वोत्तम फिल्म ॲंड थिएटर आर्टस् अकादमी म्हणून शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय लावणी,गायन आणि नाट्याभिनयाचे सर्वोत्तम प्रशिक्षण देणारी तसेच देशातील सर्व स्तरातील कलावंतांना आपले कलागुण सादर करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वोच्च मानाचे आणि हक्काचे असे राष्ट्रीय व्यासपीठ आणि कलामंच उपलब्ध करुन दिल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील अमुल्य योगदानासाठी हा पुरस्कार बालगंधर्व अकादमीचे संचालक, किशोर कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आला.

        रंगभूमी कलावंतासाठी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन अकादमीद्वारा दरवर्षी केल्या जाते.यामधे प्रामुख्यानें अकादमीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय बालगंधर्व कला महोत्सवाचे आयोजन भव्य स्वरुपाचे असते.सलग आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात राज्याच्या कानाकोपऱ्यातून कलावंत सहभागी होतात आणि राज्यातीलच नव्हे तर संपुर्ण देशातून विविध राज्यांतील विविध भागांतून कलावंत बालगंधर्व अकादमीसारख्या प्रतिष्ठित नामवंत आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च सन्मान असलेल्या अशा राष्ट्रीय कला अकादमीच्या राष्ट्रीय मंचावर आपली कला सादर करण्यात आपले सौभाग्य समजतात आणि कलेचे सर्वोत्तम सादरीकरण करत उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकतात.अकादमीने आणखी एका नव्या राष्ट्रीय मंचाची दारे कलावंतांसाठी उघडली आहेत, जिथे लवकरचं देश विदेशातील कलावंतापासूंन सर्वसामान्य कलोपासक कलावंतांना संधी देण्यात येईल असे अकादमीचे संचालक किशोर कुमार सर यांनी दिली.यासाठी कलावंतांना अकादमीच्या अधिकृत इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंटवर प्रवेश अर्ज, नोंदणी फॉर्म उपलब्ध आहेत. नाट्य आणि सिनेसृष्टीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कार या सोहळ्याला नाट्य सिनेसृष्टीतील अनेक कलांतांची उपस्थिती लावली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा