इंदापूर तालुका..... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी मोबाईल -8378081147
- पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत पिरसाहेब (उदगिरबाबा) यांच्या ऊरूसची सांगता करण्यात आली. मागील पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच कुस्त्यांच्या मैदानात महिलांच्या कुस्त्या खेळवण्यात आल्याने सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला. महिला व पुरूषांच्या लहान मोठ्या ४५० कुस्त्या खेळवण्यात आले. तर दर्गाहला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने भाविक व नागरीकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.
सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणारे ग्रामदैवत पिरसाहेब (उदगीरबाबा) यांचा सालाबाद नियम परंपरेप्रमाणे उरूस तीन दिवस चालला. त्यामध्ये पहिल्या दिवशी मानाच्या संदलची मिरवणूकीने बाबांच्या मजारवर संदल चढवण्यात आला. यावेळी संपूर्ण ग्रामस्थ मिरवणुकीमध्ये सहभागी होत रंगपंचमीचा आनंदही घेतला. दुसऱ्या दिवशी मुख्य ऊरुस निमीत्त मेवा मिठाई, खेळणी, झोके, आईस्क्रीम, सौंदर्य प्रसाधने असे विविध स्टॉलसह साहित्य विक्रीची मोठी दुकाने आल्याने मोठी यात्रा भरून मोठी आर्थिक उलाढाल झाली. सायंकाळी नऊ वाजता मानाच्या घोड्याची मिरवणूक ( छबीना ) काढण्यात आला. त्यानंतर प्रकाश अहिरेकरसह निलेशकुमार अहिरेकर यांचा प्रसिध्द लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला त्यास पंचक्रोशीतील तमाशा शौकीन उपस्थित होते.
तसेच शेवटच्या दिवशी पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकीत मल्लांच्या कुस्त्यांच्या जंगी मुकाबला घेण्यात आला. यावेळी यात्रेच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच मैदानावर महिला कुस्त्या खेळवण्यात आले. लोणी देवकर येथील अमोल तोरवे यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती अकॅडमी महिला कुस्ती पटूंच्या मैदानावरील कुस्त्यांमुळे वेगळीच रंगत निर्माण झाली होती. यामध्ये इंटरनॅशनल चॅम्पियन रोशनी बोडके विरूद्ध कर्नाटक केसरी सुजाता पाटील यांच्यात कुस्ती खेळवण्यात आली. पंच म्हणून पै. आण्णा गायकवाड यांनी काम पाहिले. तसेच इतरही महिलांच्या कुस्त्या खेळवण्यात आले. महेश बिचकुले (गारअकोले) विरूद्ध भैय्या डांगे (गोंदी) तसेच अमोल माने (खुडूस) विरूद्ध आनंदा जाधव (अकलूज) यांच्या प्रमुख कुस्त्या शेवटी खेळवण्यात आले. आखाड्यातील कुस्त्यांचे उत्कृष्ट समालोचन निवेदक युवराज केचे व महेश सुतार यांनी केले.
पिरसाहेब यात्रेसाठी लोकवर्गणी गोळा करण्यात येते. त्यातून तमाशा, कुस्त्या, वाजंत्री, फटाकासाठी त्याचा खर्च करण्यात आला. तसेच गावातील इतर यात्राही त्याच खर्चातून पार पाडण्यात येतात.
परंपरेप्रमाणे पिरसाहेब यात्रेनिमीत्त माहेरवाशिनी आपल्या संपुर्ण कुटुंबियांसह आपले बोललेले नवस फेडण्यासाठी तसेच पिरसाहेब यांना मानाप्रमाणे नैवेद्य, नारळ फोडण्यासाठी आले होते. त्यामुळे गाव यात्रेनिमीत्त मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच पंचक्रोशीत सर्व जाती धर्माचे मानणारे भाविकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथील ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या ऊरूसनिमित्त महिलांच्या कुस्त्या खेळवण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा