Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

**गुढीपाडवा निमित्त* *गुढी उभारु मानवतेची*

 




साडेतीन मुहूर्तांपैकी एक

सुरुवात मराठी नववर्षाची

ब्रम्हध्वजाची करून पूजा

गुढी उभारू मानवतेची ॥१ "


प्रेम जिव्हाळा आपुलकीला

खरी गरज मायाममतेची

दिखाव्यास नको धारा 

गुढी उभारू मानवतेची ॥२ ॥


नवक्रांतीच्या संकल्पाला

गरज समाज परिवर्ताची

स्नेहभाव मनात जपून

गुढी उभारू मानवतेची ॥३ ॥


चैतन्यमय आनंदस्वरूपी

गुढी उभारू नवसंकल्पाची

एकमेकांना समजून घेण्या

गुढी उभारू मानवतेची ॥४ ॥


गुढी विजयाचे प्रतीक

शिकवण जपू संस्कृतीची

पानाफुलांचे तोरण बांधून

गुढी उभारू मानवतेची ॥ ५ ॥



      *कवयित्री*

  *सुवर्णा घोरपडे*

 संग्रामनगर-अकलूज 

ता.माळशिरस जि.सोलापूर




*कवयिञी--सुवर्णा घोरपडे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा