Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

*पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला आणखी एक धक्का*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


सांगली - 16 एप्रिल :* माढा लोकसभेतून उमेदवारी न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यानंतर शरद पवार यांनी मोहिते पाटलांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारीदेखील जाहीर केली. यामुळे माढ्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे. यामुळे माढ्यासोबतच सोलापूरचं गणितही बदलण्याची शक्यता आहे.

मोहिते पाटील यांच्यानंतर भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. विलासराव जगताप यांनी विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. सांगलीमधून भाजपने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे विलासराव जगताप नाराज झाले आणि त्यांनी भाजपला इशारा दिला होता.

जतमध्ये विलासराव जगताप यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. पक्षांतर्गत सुरू असणाऱ्या कुरघोड्या त्याचबरोबर होणारे अवमूल्यन यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं विलासराव जगताप यांनी सांगितलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा