Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

शिखर शिंगणापूर यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांना चहा, नाष्टा व जेवणाची सोय, कडक चटक्याच्या उन्हातही पायी प्रवास सुरूच

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) येथील महादेवाची चैत्र महिन्यातील यात्रा शुक्रवार १९ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी छत्रपतींचे वंशज राजेभोसले कुटूंबीयांच्यावतीने महादेवाची महापूजा होवून यात्रेला सुरुवात होते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रसह मध्यप्रदेश व कर्नाटक राज्यातून मानाच्या कावडी, धजी व काट्यासह लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच मानाच्या कावडी, धजींची भेट यात्रेदिवशी शंभो महादेव- शंभो महादेव गजरात होत असते.



      शंभो शिवा पार्वती हर हर महादेवच्या जयघोषात व गजरात राज्याच्या कानाकोपन्यातून लाखो भाविक आपल्या मानाच्या कावडी व धजी घेवून गुडी पाडव्यापासून पायी चालत शिंगणापूरच्या दिसेने चालले आहेत. यामध्ये गंगाखेड, परभणी, अंबेजोगाई, परळी, बीड, गेवराई, मंगरुळ, उस्मानाबाद, लातूर, औसा, केज बरोबर विदर्भ, मराठवाड्यातील गावा गावातून महिला, पुरुष व अबालवृद्ध भाविक दररोज जवळपास ४५ ते ५० किलोमीटर पायी चालत आहेत. शुक्रवारी दि.१९ रोजी एकादशीनिमीत्त शंभो महादेवाची महापूजा करण्यात येते. त्याचदिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठी यात्रा भरते.

    पायी चालत चाललेल्या भाविकांना गावो गावच्या नागरीकांच्यावतीने शरबत, चहा, नाष्टा, जेवणावळी देवून भावीकांची भक्ती केली जाते आहे. नरसिंहपूर येथील नीरा भिमा नद्यांच्या पवित्र संगमावर सर्रास भाविक अंघोळी करून इंदापूर तालुक्यात प्रवेश करून नरसिंहपूर, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, बावडा, वालचंदनगर मार्गे फलटण तालुक्यात प्रवेश करून शिखर शिंगणापूरला दर्शनास हजेरी लावतात. टणू गणेशवाडी, शिंदेवस्ती, बावडा, लाखेवाडी, रेडणी, निमसाखर गावातून जाणाऱ्या भक्तांच्या चहा, नाष्टा, शरबतची सोय करण्यात आली. तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. पिंपरी बुद्रुक येथे लोकनेते कै. महादेवराव बोडके दादा व ग्रामस्थाच्यावतीने मराठवाड्यातून येणारी विलास ढवाण यांच्या मानाच्या धजीला परंपरेप्रमाणे भाविकांना जेवणाची सोय करण्यात आली होती. तसेच परभणी जिल्ह्यातील कोदरी येथील २०० वर्षांपूर्वीची जुनी मानाच्या कावडीला तर लातूर जिल्ह्यातील घोणसी येथील २१ वर्षांपूर्वीच्या जुन्या कावडीला शंकर व शहाजी बोडके कुटूंबियांच्यावतीने जेवणाची सोय केली होती.


  परभणी जिल्ह्यातील कोदरी येथील २०० वर्षांपूर्वीची जुनी मानाच्या कावडीला शिखर शिं- गणापूर देवस्थानच्या वतीने ७२ हजार कावडी व ५००० काट्या पैकी एकादशी दिवशी धजाचा मान असतो असे माणिक प्रभाकर एकपट्टे महाराज यांनी सांगितले.

चौकट - मागील अनेक वर्षांपासूनची परंपरा जपत शिंगणापूरला गुडी पाडव्यापासून हजारो भाविक पायी चालत जातात. परंतू यावर्षी चटकत्या कडक उन्हाचा कहर व लोकसभा निवडणुकीची धामधूम यामुळे भाविकांची संख्या कमी झाली असल्याचे दिसत आहे. परंतू अनेक महिला, पुरूष, लहान बालके व अबालवृद्ध केवळ शंभो महादेवाच्या श्रद्धेपोटी उन, वाऱ्याची त्या न बाळगता पायी चालत चालले आहेत.

फोटो - गणेशवाडी येथे सकाळच्या प्रहरी नाष्ट्यासाठी आलेली कावड दिसत आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा