*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज येथील सारनाथ बुद्ध विहार व समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने महकारुणी , तथागत- भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त बुद्ध जयंती महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सारनाथ बुद्ध विहार च्या वतीने देण्यात आली आहे
बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित करण्यात आले आहे --मंगळवार दि.21/ 5 /2024 रोजी सायंकाळी 6/30 वा. प्रबोधनात्मक भीम बुद्ध आणि संविधान गीतांचा जल्लोष ,सलाम संविधान महाजलसा, निर्माता/ गायक /संगीतकार -कबीर नाईक नवरे ,कोल्हापूर --प्रायोजक अनिल भैय्या मोरे (पंचशीलनगर) अकलूज
बुधवार दि. 22/ 5/ 24 रोजी सायंकाळी 7/30 वा." *कौन बनेगी धम्मरत्न"* निवेदक -शेखर ओहोळ ,(बारामती) आयोजक-- समस्त बौद्ध बांधव अकलूज तसेच विजेत्यांना गृहपयोगी आकर्षक बक्षिसे देण्यात येतील
गुरुवार दि. 23/ 5 /24 (बुद्ध पौर्णिमा) सकाळी 5/45 वा. बुद्ध पूजा व गाथापठन, सकाळी 6/15 वा. संगीतमय कार्यक्रम धम्मसकाळ ,निर्माता/ गायक/ संगीतकार ,विजय सरतापे आणि संच --(वालचंद नगर ) प्रायोजक --कबीर मोरे सकाळी 9/30 वा. सामूहिक वंदना व गाथापठन, सकाळी 10 वा. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व बुद्ध पूजा होणार आहे.
सकाळी 10/30 वा. "खीरदान " सौजन्य ---विलासा नंद गायकवाड व अजिनाथ जाधव सर (अकलूज)
सायंकाळी 6 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील( भैय्या) मोहिते पाटील यांच्या हस्ते -बुद्ध प्रतिमेचे पूजन भव्य मिरवणुकीस प्रारंभ व विशेष सहभाग नवदीक्षित श्रामनेर संघ पानीव,
सायंकाळी 8/30 वा. स्नेहभोजन-- अन्नदाते -अक्षय भाऊ चंदनशिवे फाउंडेशन अकलूज व पाणी प्रयोजन-- किरण (तात्या) धाईंजे इत्यादीचा सहभाग असून या सर्व कार्यक्रमास सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन" सारनाथ बुद्ध विहार व समस्त बौद्ध बांधवांच्या " वतीने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा