Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ मे, २०२४

*43 माढा लोकसभा मतदारसंघात 60 टक्के मतदान तर फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.23 टक्के मतदान*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

43 माढा लोकसभा 2024 मतदारसंघाची निवडणूक दि. 7 मे रोजी पार पडली असून या मतदारसंघात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण, आणि माण ,असे एकूण 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश असून माढा लोकसभा मतदार संघातील फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.23% मतदान झाले असून सर्वात कमी 55% मतदान करमाळा विधानसभा मतदारसंघात झाले आहे माढा लोकसभा मतदार संघात एकूण 1991454 मतदार असून त्यापैकी पुरुष मतदार 1035678 तर 955706 महिला मतदार आहेत ++करमाळा विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार 166803 पैकी 98529 पुरुष मतदारांनी तर 15114 महिला मतदारा पैकी 76323 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून 55% मतदान झाले आहे ++ +माढा विधानसभा मतदारसंघात एकूण 337632 मतदार असून 177772 पुरुष मतदारांपैकी 115297 मतदारांनी तर 159857 पैकी 91085 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून 61.3% मतदान झाले आहे



+++ सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 312498 मतदार पैकी 163713 पुरुष मतदार असून त्यापैकी 1031 79 पुरुषांनी आणि 148783 महिला मतदारांपैकी 84119 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून 59.94% मतदान झाले आहे

 +++माळशिरस विधानसभा मतदारसंघात एकूण 337386 मतदार असून पुरुष मतदार 17 5317 पैकी 112898 पुरुषांनी तर 162038 महिला मतदारांपैकी 90458 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून 60.28% मतदान झाले आहे

 +++फलटण विधानसभा मतदारसंघात एकूण 335999 मतदार असून 172046 पुरुष मतदारांपैकी 115578 मतदारांनी तर 163939 महिला मतदारापैकी 100231 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.23 टक्के मतदान झाले आहे

   +++माण विधानसभा मतदारसंघात एकूण 350011 मतदार असून 180027 पुरुष मतदारापैकी 107136 पुरुष मतदार आणि तर 169975 महिला मतदारांपैकी 97332 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असून 58.42 टक्के मतदान झाले आहे.

   अशी माहिती 43 माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग यांनी दिली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा