*विशेष -प्रतिनिधी--राजु मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--84088 17333
माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे ग्रामपंचायतीला या वर्षी चा LIC चा बिमा ग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे 1 लाख रुपये आणि बिमा ग्राम पुरस्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदाशिवनगर मधील ग्रामस्थांना विम्याचे महत्त्व पटवून देऊन आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये गावातील 70 लोकांना विमा देऊन या वर्षी सागर उरवणे यांनी हा पुरस्कार मिळवून दिला या मधून मिळणारी बक्षिसाची रक्कम ही गावातील विकास कामाच्या साठी खर्च केली जाते. एलआयसी मार्फत गावाच्या विकासासाठी संपूर्ण देशात हि योजना राबविण्यात येत असुन यामध्ये प्रत्येक गावांनी याचा लाभ घेतला पाहिजे असे विकासअधिकारी अमोल काळे यांनी सांगितले . एलआयसीचे चीफ मॕनेजर गुळवणी, शाखाधिकारी व्हि.व्हि. आगवेकर, विकास अधिकारी निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे प्रतिनिधी सागर उरवणे यांनी .सांगितले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा