Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० मे, २०२४

*ॲड-" उज्वल निकम" यांनी सरकारी घर घेऊनही हॉटेलची बिले उकळली ! काँग्रेसचे प्रवक्ते *सचिन सावंत "यांनी सादर केली बिले*

 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


राज्य सरकारने 2 टक्के स्वेच्छाधिकार कोट्यातून ॲड. उज्ज्वल निकम यांना वर्सोवा भागात घर देऊनही त्यांनी 2011 ते 2014 या कालावधीत मुंबईत राहण्यासाठी हॉटेल बिलापोटी सुमारे 17 लाख रुपये उकळले, असा गौप्यस्पह्ट प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला.

पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत यांनी उत्तर-मध्य मुंबईतील भाजपचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावर हा आरोप केला. सरकारी कोट्यातून मंजूर झालेले घर, त्यांच्या फीबाबतचा शासननिर्णय, तसेच त्यांनी आकारलेली बिले यांचे पुरावे सचिन सावंत यांनी सादर केले. त्यामुळे नैतिकतेच्या पातळीवर ॲड. उज्ज्वल निकम यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे सावंत यांनी सुनावले.

मुंबईवरील '26/11' च्या दहशतवादी हल्ल्यातील खटल्यात ते सरकारी वकील होते. या हल्ल्याचा तपास, कसाबला झालेली फाशी हे सर्व काँग्रेसच्या काळात झाले. मात्र ॲड. निकम याचे श्रेय आता भाजपला देऊन यावर प्रचार करत असून हे दुर्दैवी आहे, ॲड. निकम यांना नीतिमत्ता नाही, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

सरकारी वकील म्हणून कायदेशीर बाजू मांडताना त्यांनी राहण्यासाठी लाखो रुपयांची हॉटेल्सची देयके घेणे हे नैतिकतेच्या पातळीवर पुठे बसते?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा