*अकलुज ---- प्रतिनिधी*
**केदार----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नागरिकांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभाग होऊन निर्भयपणे,भयमुक्त वातावरणात निवडणुक पार पाडण्याच्या दृष्टीने व मतदानाचे प्रमाणात वाढ होण्यासाठी अकलूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनजागृती करिता पथसंचलन करण्यात आले.
माढा लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने प्रितम यावलकर,अपर पोलीस अधीक्षक,सोलापूर (ग्रामीण),नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग,अकलुज भानुदास निंभोरे, पोलीस निरीक्षक,अकलुज पोलीस ठाणे तसेच अकलुज पोलीस ठाण्याचे ४ अधिकारी १० अंमलदार तसेच बंदोबस्ताकरीता आलेले एस. आय.पी.एफ.गट क्र.५ दौंड ३ अधिकारी ७४ अंमलदार, एस.आर.पी.एफ.गट क्र. १० सोलापूर ३ अधिकारी १०१ अंमलदार,आंध्रप्रदेश पोलीस २ अधिकारी,६६ अंमलदार, माळशिरस कडील एस.आर. पी.एफ. गट क्र.७ दौंड २ अधिकारी ३० अंमलदार असे एकुण १४ अधिकारी, २८१ अंमलदार यांनी आज सायंकाळी अकलुज शहरात महर्षी चौक, सदुभाऊ चौक,गांधी चौक,विजय चौक,जुने पोलीस ठाणे समोर, आण्णाभाऊ साठे चौक,आझाद चौक,गणेशनगर,पंढरपूर नाका व आजुबाजुचे परिसर व हद्दीतील यशवंतनगर,चौंडेश्वरवाडी, उदयनगर,संग्रामनगर,माळीनगर, सवतगांव,बिजवडी,गिरझणी, विझोरी,माळेवाडी (अ),आनंदनगर,बागेचीवाडी, कोंडबावी या गावात पायी रुटमार्च काढण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा