बोराटवाडी-(ता.इंदापूर)--प्रतिनिधी--मोहसिन शेख
आज झालेल्या ४५ बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकी च्या मतदानात दोन दिग्गज नेत्यांसह एकूण 38 उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले असुन
सकाळपासूनच युवापिढी सह ज्येष्ठ नागरिक देखील मतदानासाठी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत असल्याचे चित्र दिसत होते विशेष करून दुपारी रखरखत्या भर उन्हात देखील वृद्ध मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे राहून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावताना दिसत होते.त्यामूळे कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये एक वेगळी उर्जा जाणवत होती.
शहरासह संपूर्ण तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखत सकाळ पासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे.
मतदारांचा उत्साह पाहता तालुक्यातील मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा