उपसंपादक---- नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ शाखा आष्टा (जिल्हा सांगली) यांच्या वतीने श्री रेणुका माता मंदिरात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताहाचे आयोजन दि.३० एप्रिल ते ६ मे २०२४ या कालावधीत करण्यात आले होते.या कार्यक्रमात दररोज सकाळी ८ वाजता सामुदायिक गुरूचरित्र वाचन घेण्यात आले होते.
दि.२९ एप्रिलला ग्रामदेवता सन्मान,मंडल मांडणी व अग्नी प्रदिपन,दि.३० एप्रिला मंडल स्थापना,स्थापित देवता हवन,नित्य स्वाहा:कार,दि १ मे ला नित्य स्वाहा:कार श्री गणेश याग व श्री मनोबोध याग,दि.२ मे ला नित्य स्वाहा:कार श्री स्वामी याग,दि.३ में ला नित्य स्वाहा:कार चंडी याग,दि.४ मे ला श्री गिताई याग,दि.५ मे ला श्रीरूद्र याग व मल्हारी याग,दि.६ मे ला बली पुर्णाहुती,सत्यदत्त पूजन व अखंड नाम जप यज्ञ व समाप्ती सांगता सोहळा आज संपन्न झाला.आज सकाळी आयोजित केलेल्या श्री मल्हारी याग या कार्यक्रमाचे यजमानपद अकलूजचे वृत्तपत्र छायाचित्रकार श्री केदार लोहकरे व सौ.मोनिका लोहकरे या उभयतांनी यजमानपद भूषविले या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त सेवेकरी सहभागी झाले होते.अशा रीतीने श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी निमित्त सोहळा संपन्न झाला.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रोहित पाटील, अनिकेत नांद्रेकर,रवि पाटील, दिलीप पोतदार (पुजारी) अजिंक्य पन्हाळकर परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा