*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
**सांगली*
*मो ;-8983587160
सांगलीतील एका कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचे औषध पाजून एका तरुणीवर बलात्कार झाल्याने कॅफे च्या विश्वासार्हतेचा आणि तरुणींच्या सुरक्षिततेचा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न पुन्हा एकदा "ऐरणीवर" आला आहे.
सडेतोड - लेख लिहून मी पोलीस - प्रशासनाला जागे केले होते !
सांगलीतील काही कॅफेमध्ये तरुण - तरुणींचा रोमान्स आणि भविष्यात सेक्सस्कॅन्डल सारखे प्रकार घडवून आणेल,असे "भाकीत" मी केले होते. व 2 निर्भीड - धारदार लेख लिहून समाजप्रबोधन केले होते. आज एका तरुणीवर झालेला बलात्कार हे हिमालयाचे* एक "टोक" आहे. असे बरेचसे प्रकार "पचवण्यात" आले आहेत.
कॅफेमध्ये कोल्ड्रिंक्स ची टोपन कमी पण "निरोध" ची पाकीट जास्त !
सांगलीतील एस टी.स्टॅन्ड परिसर आणि सांगलीतील वादग्रस्त बहुतांशी ठिकाणी "काळी काच" लावलेली अनेक कॅफे आढळून येतात . वास्तविक काळी काच लावण्यामागे हेतू काय असेल ??? तरुण - तरुणींसाठी (Open) जागेत न बसवता लॉजप्रमाणे सोय करण्यामागे कारण काय असावे ???
आज सांगलीसह ग्रामीण भागातील तरुणाईचे S. T. Stand परिसर आवडीचे ठिकाण बनले आहे .काही कॅफेमध्ये कोल्ड्रिंक्सच्या टोपणापेक्षा निरोध ची "पाकिटे" जास्त आढळतात असे समजते. संबंधित कॅफेमालक आणि तरुण -तरुणींचे हितसंबंध असतात. त्यामुळे "गर्दी" आहे किंवा नाही हे तपासून जोडपी कॅफेमध्ये येत असतात. आणि काम झाल्यावर 500 रुपयांची टीप देऊन आनंदाने जातात.
कॅफेमध्ये असणाऱ्या सी सी .टी.व्ही. कॅमेऱ्याच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग सांगलीतील बहुतांशी कॅफे हे फॅमिली सह कॉफ़ी/नाष्टा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत .सर्वच कॅफेचालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे "अन्यायकारक" आहे . परंतु सांगलीतील काही "वादग्रस्त" कॅफेमध्ये सर्रास जोडप्यांचा नंगानाच सुरु असतो. या कॅफेमध्ये जे तरुण - तरुणी येतात, त्यांच्याबद्दल संबंधित कॅफे मॅनेजर अथवा मालक परिचित असतात. कारण हा" चोरीचा मामला ..हळू हळू बोंबला .." अशा प्रकारात मोडतो. कॅफेमध्ये जे वकंपार्टमेन्ट केलेले असतात, तेथे जो कॅमेरा असतो त्याच्या माध्यमातून तो मॅनेजर त्यांचे रोमान्स चे विविध "सीन", व फोटो सेव (save) करतो. आणि त्या तरुणीला ते "फोटो" दाखवून तिला ब्लॅकमेलिंग करतो व त्याच्या प्रियकराला न सांगता त्या कॅफेमध्ये येऊन रोमान्स करण्यासाठी "दबाव" आणतो. सांगलीत नुकताच झालेला हा प्रकार युवतींच्या डोळ्यात अंजन घालणारा आणि त्यांना "जागे" करणारा ठरत आहे.
जोडपे आत ,शटर ला बाहेरून कुलूप*!
सांगलीमध्ये मध्यवर्ती ठिकाण म्हणजे एस.टी.स्टॅन्ड परिसर होय. विविध मेडिकल्स,आणि ट्रॅव्हल्स च्या ऑफिसेस ने नटलेला हा परिसर बेसमेंट आणि छोट्या मोठ्या इमारतीने फुललेला आहे. ग्राहकाला मनसोक्त सेवा देता यावी म्हणून कॅफेमध्ये उत्कृष्ठ सेवा "पुरवली" जाते. विविध सोयींनी सज्ज असणाऱ्या काही कॅफेमध्ये जोडप्याना दिलासा मिळतो. मॅनेजर अथवा जो मालक असतो,त्याला मोबाईल नंबर दिला जातो, शटर ला बाहेरून कुलूप लावले जाते, व काही वेळाने, "कामं झाल्यावर' आतून "फोन" आल्यास शटर बाहेरून उघडले जाते. इतकी "कार्यतत्परता" अशा कॅफेमध्ये असेल तर हाकेच्या अंतरावरील पोलिसांना याचा "सुगावा" कसा काय लागत नाही ??? पोलिसांना या कॅफे मधील प्रकारांची माहिती नसावी का ?
कॅफेमध्ये 200-500 मध्ये भागत असेल तर लॉज मध्ये 1000 रुपये का ?
आज सांगली -मिरजेतील अनेक लॉजला साजेसा व्यवसाय च करता येत नाही. जर कॅफेमध्ये सर्व काही सुखसमाधान" मिळत असेल तर लॉज मध्ये ते खर्च का करतील ? अशा या कम्पार्टमेन्ट मधील कॅफेमुळे लॉजला जबरदस्त फटका बसत आहे,ही वस्तुस्थिती आहे. कॅफेमध्ये दररोज 30 - 40 हजारांची उलाढाल होत असेल तर लॉजमधील उत्पन्न 10 ते 12 हजार इतकीच असते. लॉजेस च्या "तोट्यामागे" हे वादग्रस्त कॅफेच कारणीभूत असावीत,असा कयास
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान च्या नितीन चौगुले यांचे अभिनंदन !*
नितीन चौगुले यांनी अल्शील व वादग्रस्त कॅफेबाबत वारंवार आवाज उठवत, तरुणींच्या अब्रूशी खेळणाऱ्या तरुणांपासून वाचवण्यासाठी, मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री - आमदार -खासदार यांना त्यांनी निवेदने दिली आहेत .विधानसभेत आवाज उठवण्यासाठी सातत्याने "पाठपुरावा" करणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या . नितीन चौगुले यांचे ही "अभिनंदन" करायला हवे. भविष्यात पोलीस-प्रशासनाने भविष्यात बलात्कार सारखे प्रकार घडू नयेत यासाठी काळजी घ्यावीत.
पालकांचे आपल्या मुलींवर लक्ष असावे* !
आपली मुलगी कॉलेजला /शाळेला कधी जाते ,कधी येते याची खातरजमा पालकांनी वेळोवेळी करावी. शाळा /कॉलेज च्या नेहमी संपर्कात राहावे . घरात नेहमी मुलींना प्रबोधन करावे. घरातील वातावरण खेळकर ठेवत मुलीला बोलके करावे. योग्य - अयोग्य याची सांगड घालत तरुणांच्या "फसवणुकीपासून" सावध राहण्याच्या टिप्स द्याव्यात
.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला* (*पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक -वेध मीडिया न्यूज ,
*मोबाईल - 8983587160*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा